पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ प्रसन्न राघवनाटक १०९ ने जरी निवारण केले तरी दक्षिण दिशेस गेला. (पडद्यांत शब्द होतो.) सखे यमुने तुझें कल्याण झालें. य०- सुयांनी टोचलेल्या माझ्या नखांला आळित्याच्या र. साने रंगविणारी ही कोण ? ( इतक्यांत तुंगभद्रा नदी पडद्याच्या बाहेर प्रवेश करून ह्मणते.) हे नदीनाथा सामरा, तुझा जय असो, जय असो. सा०- यमुनेचे कल्याण झाले ह्मणालीस ते कसें ९ - तं०- यमुनेचा बंधु जो सुग्रीव त्याला राज्यपदप्राप्ति झाली ह्मणून. य०- आतां एका शरीराच्या बाजूला चंदनरसाची उटी आणि एका बाजूला सूर्याचे कडक ऊन्ह असी माझी अवस्छा झाली आहे. मा०- बरें, वाळी राज्यकरीत असतां राज्यलक्ष्मी सुग्रीवाला कशी मिळाली ? तं०- आतां वाळीची गोष्ट कशाला पाहिजे ? सा- कां बरे १ तं०- सीतेच्या पायांतले जे नपुर पडले होते, ते मारुतीने रा. मचंद्राला दाखविले, तेणेकरून रामचंद्रास विश्वास आला. मग मारुतीने सुग्रीवाची आणि रामाची मैत्री करून दि. ली, आणि आपण रामाचा दास होऊन त्याच्या हातून हे करविलें. श्लोक. तो कांचनाचा मृग मारला जसा वाळी शरानें वधिला क्षणे तसा ॥ रामें स्वहस्ते अभिषिक्त सत्वर मुग्रीव केला मग वानरेश्वर ॥५५॥ १०.