पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

a प्रसन्नराघवनाटक अंक ५ REP लोक सीतेचा चरणांतला निसटला रत्नाढ्य जो नूपुर आक्रंदे करुणास्वरें मग पडे येऊन पृथ्वीवर ।। गं०- आतां तर आह्मी निराश झालो. गो हे दुष्टा पळ एक तूं ठर पहा मेलास हे बोलतां जो पक्षीश जटायु खड्गहत तो भूमीस आला स्वतां ॥५३॥ सा- हे मुली जानकी, आतां खचीत रावणाने तुला नेली. (असे बोलून मूर्छा येऊन पडतो.) गंगा (जवळ येऊन लुगड्याच्या पदराने वारा घालीत घा. लीत ह्मणते. ) अरे रघुकुलवत्सला सागरा, सावध हो, सा. वध हो, ( नंतर सागर सावध होऊन ह्मणतो. ) एथें तू केव्हां आलीस १ गं०- नुकतीच आले. यमुना आणि सरयू ह्या ही दोघी आ. ल्या आहेत. सा- तर मग तुह्मी सर्व ही मला भेटलां, हे बरे झाले, हामी तर शोकाच्या वेगानें मत प्राय झालो आहे... गं०- धैर्य सोडूं नको; कांकी बहुत करून, आर्या संपत्ति ही खळाला आल्या पण शेवटी न सुख देती ॥ आल्या विपत्ति ही पण साधूला शेवटी सुखद होती ॥५४॥ स.- सखे गोदावरी, बरें तें सीतेच्या पायांतले नपुर पडले त्याचे पुढे काय झाले हे तुला ठाऊक आहे काय ? गो०- होय, मला एक्या वनदेवतेने सांगितले. की ते नपुर घेऊन कोणी एक वानर ऋष्यमूक पर्वताकडे गेला. सा०- बरें, रामचंद्राचा वृत्तांत कसा काय झाला ? गो०- रामचंद्र सीतेच्या वियोगाने विव्हळ होऊन लक्ष्मणा