पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ प्रसन्नराघवनाटक गं०- हे सखे सरयू, हें सीता रामलक्ष्मणांचें वर्तमान ऐकून माझें मन घाबरे झाले आहे. स- हे भगवति गंगे, तूं घाबरूं नको, कांकी, तूं जो हंसाला आशीर्वाद दिला आहेस न्यांत त्वां नपुरशब्दाचा उच्चार के. ला, तेणेकरून मला स्मरण झाले. कोणते मणशील तर सां. गते ऐक, जेव्हां जानकी अरण्यांत जाण्याविषयी तयार झाली, तेव्हां तिला सर्व पतिव्रता स्त्रियांत श्रेष्ठ जी वसिष्ठ पत्नी अरुंधती; ती आपल्या हातांत दोन नूपुरे घेऊन असे ह्मणाली.enay आर्या हे रत्नजडित दोन्ही नूपुर पायांत घाल गुण यांचा ॥ नाम दिन एक ही न व्हावा वियोग रमणीस आत्मकांताचा ॥४५॥ गं०- आतां कांहीं मला भरवसा आला; कांकी ती माझी सखी वसिष्ठ पत्नी अरुंधती कधी खोटें सांगावयाची नाही; तर चल ये, हा वृत्तांत रघुकुलाविषयी वन्सल जो सागर त्याला सांगू. (मग त्या जातात.) (गंगा विस्मित होऊन ह्मणते.) वा! प्रवाहाच्या शीघ्र वेगाने एका क्षणांत फार दूर आलो. पहा, हा समुद्र गोदावरी नदीशी कांहीं भाषण क. रीत जवळच बसला आहे. या तदनंतर गोदावरी नदी आणि समुद्र हे पडद्याच्या बाहेर प्रवेश करतात. सागर, ( गोदावरीस ह्मणतो. ) मग पुढे काय झालें । गं०- एथें ही राहिलेल्या वृत्तांताचे वर्णन व्हावयाचे आहे काय ९ य..- होय, जे हंसापासून समजले नाहीं तें गोदावरीच्या - मुखाने ऐकायाचंच आहे. गो०- तदनंतर.