________________
अंक प्रसन्नराघवनाटक १०३ स.- आतां माझ्या जीवांत जीव आला, जसे अगोदर कड. कडीत ऊन्ह पडते; परंतु मग पर्जन्याची वृष्टि मोठी होते, तसे हे हंसाचे भाषण आरंभी दुःखदायक दिसून मग सुख दायक झाले. हं0- तदनंतर. यं०- हे रामचंद्राचे कृत्य पाहून मुनींनी संतुष्ट होऊन राम लक्ष्मणांला पुष्कळ आशीर्वाद दिले. मग सुखाने काही दिवस ते त्या गोदावरीच्या तीरीच राहिले. तदनंतर एके दिवशी. लोक माणिक्यरत्नांकितनेत्ररक्त 'वृक्षांतरी विद्रुमशृंगयुक्त ॥ सुवर्णदेही वर मोक्तिकांचा जडाव आला मूग या तन्हेचा ॥३६॥ गं0- (मनांत ह्मणते. ) हा खचीत अनर्थाचा अंकुर उगवला. (मग उघड ह्मणते.) पुढे काय झाले ? हं० आर्या त्यातें तो अनुसरला भूजितमन्मथधनुष्य नयनांत ।। सीतेचा धनुविजितस्त्रीभ्रू नीलाब्जकांति मग कांत ॥३॥ तदनतर, RAINP श्लोक तो घाबरे रामशरें कुरंग हे लक्ष्मणा धांव ह्मणे सुरंग ॥ ते वाक्य त्याचे श्रवणी शिरून या गेले च सीतामन घाबरून ॥३८॥ १ झाडीमध्ये २ (विदुम) पोवळीं. ३ ( नयनांत) कटाक्ष ४ चांगल्यारंगाचा