पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ५ श्लोक. भयाभीत पाहून सीता मृगांतें दयायुक्त झांकी स्ववस्त्रं धनतें ॥ पतीच्या तशी आपल्या कर्णभागी यवाच्या धरी अंकुरा सुंदरांगी ॥२१॥ दुसरेही. श्लोक ती चक्रवाकी पुलिनी नद्यांच्या तशी तटाकी न सरोवरांच्या ॥ टाकी स्वकांतास ह्मणून शीता संतोषली कांत वियोगभीता ॥२२।। ग०- दीनांवर अशी कृपा करणारीच माझी जानकी आहे. (पुन्हा प्रेमयुक्त ह्मणते. ) अरे हंसा, बरें, सीता, राम, आणि लक्ष्मण ह्याचे मन पांथनीतीला अनुसरले होते काय ? हं०- पांथांची नीति ती कशी काय असते ? श्लोक गं0- जो पर्यंत न ऊन तीक्ष्ण पडलें तो मार्ग उल्लंघणे विश्रांतिस्तव राहणे मग पुन्हा तें मंदतां चालणें ॥ मार्गी सूर्यविकासि कंज़ मिटतां तेथें पुन्हा थांबणे पांथाला सुखदायक प्रतिदिनी ही वर्णिली लक्षणे ॥२३॥ ह- हे भागीरथी, ह्या नित्य प्रवास करणा-यांची अशीच व्यवस्था कशी राहील ? गं०- शिवशिव, माझी जानकी तर फार सुकुमार, तेव्हां ति. १ कमळ