पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ प्रसन्नराघवनाटक समश्लोक चाले राम पुढें विदेहतनया मागें त्वरेने निघे ती आरक्तपदें तिची स्वजन तो सारा बिचारा बधे । त्याचे लोचनवारिबिंदु गळती मुक्ताफळां सारखे पूर्वी शीतल उष्ण ही मग तसे म्यां तकिले तन्मुखें ।।१२।। गं0- हा नेत्रांतून थंड आणि कढत पाणी पडण्याचा प्रकार - आनंद आणि दुःख ह्यामुळे होत असतो.. स०- संबंधीजनाने रामचंद्राला हे सांगितले, की 36 श्लोक आहां तुही केवल बंधु दोन लम 'विदेहकन्या तर ही लहान ॥ कलाकार रात्रिचरांची स्थिति दक्षिणेस जाऊ नको तूं तर त्या दिशेस ॥१३॥ गं०- पुढे काय झाले ? स०- दक्षिणदिशेसच राम गेला. आर्या सुरदुंदुभिस्वनांच्या दुप्पट गुणघोष ने धनुष्य करी ॥ घेऊन राम गेला पौरांची नयनकमळमाळ धरी ॥१४॥ य०- देवांच्या दुंदुभीचा शब्द तेव्हां कशासाठी झाला १ गं०- सखे, रामचंद्र वनांत गेला, तेव्हां तो राक्षसांचा संव्हार करीलच ह्या आनंदाने देवांनीं दुंदुभी वाजविल्या. ( पुन्हा दुःखयुक्त होऊन ह्मणते. ) हे राजा दशरथा, सर्व गुण आणि संपत्ति ही अनुकूल असून तुला एक दैव मात्र प्रतिकू. ळ झालें. य०- दशरथाने रामचंद्रासारखा पुत्र तृणासारखा टाकून दि. १ सीता २ राक्षसांची.