सकारात्मक जगण्याची
कला शिकविणारे आत्मकथन
अच्युत गोडबोले
"अच्युत, अवघड गोष्ट सोपी करून लिहिण्याची कला तुला चांगली अवगत आहे. म्हणूनच तुझी सर्व पुस्तकं खूपच वाचनीय असतात, 'मुसाफिर' तर सगळ्या पुस्तकांचा कळस आहे."
- मोहन आगाशे
‘मुसाफिर'च्या लिखाणाला वाः म्हणायला धीर होत नाही. कारण ते वाःच्या पलीकडचं आहे...
-अनिल अवचट
समृद्ध जीवनाचा हा निव्वळ आत्मचरित्रात्मक लेखाजोखा नसून ज्या प्रवाहात वाहतो आहोत त्या कालौघाचाही अत्यंत तन्मयतेने घेतलेला रोचक आढावा आहे.
- अरुण साधू
एक अत्यंत वाचनीय, माहितीपूर्ण आणि 'सकारात्मक जगण्याची कला शिकवणारे' उपयुक्त पुस्तक!
- रत्नाकर मतकरी
पाने : ४६४, किंमत : रु २५०
मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर
अच्युत गोडबोले
असंख्य वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडेल अशी मानसशास्त्राची रंजक कहाणी सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, विद्यार्थी, शिक्षक अशा सर्वांना प्रचंड उपयुक्त ठरेल.
- डॉ. प्रकाश आमटे
पाश्चात्त्य ज्ञानशाखांची ओळख मराठीत करून देण्याच्या अच्युतच्या प्रचंड प्रकल्पातील हे नवे पुस्तक. 'मनात'चे मुखपृष्ठ व मलपृष्ठ या मधल्या पाचशे-सहाशे पानांतून घरबसल्या मेंदू आणि मानस या विश्वाची विमानयात्रा घडेल. याहून स्वस्त एअरलाईन उपलब्ध नाही.
- डॉ. अभय बंग
व्यापक, अभ्यासपूर्ण, विषयाची संपूर्ण ओळख करून देणारं, अतिशय पायाभूत माहिती असलेलं मानसशास्त्रावरचं अच्युतचं हे नवं पुस्तक ‘मनात' फॅसिनेटिंग आहे
- डॉ. मोहन आगाशे
पाने : ६३२ किंमत : रु. ३७५