Jump to content

पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पोस्टमॉर्टम्
डॉ. रवी बापट । सुनीति जैन



आरोग्यव्यवस्थेत जे काही चाललं आहे त्यामुळे समाज उद्विग्न झाला आहे, लोकांचा विश्वास उडत चालला आहे. डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यातील दरी वाढत चालली आहे. हे का आणि कसं घडत गेलं याचाच वेध घेण्याचा हा प्रयत्न. सामान्य माणसाला पडणारे हे प्रश्न आहेत. या व्यवसायाला पूर्वप्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. आकस नाही आस्था आहे, टीका नाही विधायक सूचना आहेत. आजच्या आरोग्य व्यवस्थेतील वास्तवाचं हे पोस्टमॉर्टम्!

पाने : २५२, किंमत : र २३०

ड्रीमरनर
ऑस्कर पिस्टोरिअस

सहलेखक : गियान्नी मेरलो
अनुवाद : सोनाली नवांगुळ

आपल्या घरी जन्माला आलेलं बाळ थोडं वेगळं आहे... त्याच्या पायातल्या महत्त्वाच्या हाडांवाचून ते जन्माला आलंय असं त्यांना कळलं. ऑस्करच्या आई-बाबांनी त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखालून कापण्याचा अवघड निर्णय घेतला... त्याला भविष्यात जास्तीतजास्त नॉर्मल जगता यावं यासाठी! त्याच्या आईनं त्याला एक पत्र लिहिलं होतं, त्यात ती म्हणते, “अंतिम रेषा सगळ्यात शेवटी पार करणारा हा खरा हरतो का? त्याला पराजित म्हणायचं का? नाही! जो कडेला बसून नुसता खेळ पाहतो आणि खेळात, स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करायला धजत नाही तो खरा पराजित!" 'ड्रीमरनर' म्हणजे पायांशिवाय ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असामान्य धावपटूची त्याच्याच स्मरणसाखळीतून उलगडत जाणारी जीवनकहाणी.

पाने : १७६, किंमत : र १७०