पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भीतीनं पळापळ आणि चेंगराचेंगरीतून झालेली दुर्घटना आहे. ते पोलीस अधिकाऱ्यांचे मॉब सायकॉलॉजीच्या गलथान हाताळणीचं अपयश म्हटलं पाहिजे.

 गर्दी आणि अफवा यांचे अतूट नातं असतं. कावळा उडाला तर म्हैस उडाली अशा विपर्यस्त अतिरंजित, पद्धतीनं अफवा पसरत असतात. शिंगणापूरबाबत चंद्रकांत इनसायडरला म्हणाला, “जस्ट इमॅजिन! खाननं मला गोळीबार करावा लागेल असे फक्त म्हटलं होतं. अजून रीतसर परवानगी तालुका दंडाधिकारी म्हणून मागितली नव्हती आणि ती मी त्यानंतर गरज भासली तर दिली असती वा नाकारली असती, पण केवळ त्या उद्गारानं अफवा पसरल्या गेल्या असत्या, त्याचा क्रम असा राहिला असता. एक - पोलिसांनी गोळीबाराची परवानगी मागितली. दोन - रावसाहेबांनी ती दिली, तीन - पोलिसांनी पब्लिकला घेरलं आणि प्रथम हवेत व मग नेम धरून गोळीबार सुरू केला. चार - काही माणसं जखमी तर काही मृत, इ.इ."

 पहिली अफवा कानावर पडते, ती हातोहात दुसरीकडे पोचवताना त्यात स्वत:च्या अनुभवाची आणि कल्पनेची भर घालून दिली जाते. मूळ 'कावळा उडाला' असेल तर शेवटचा माणूस 'म्हैस उडाली' असं छातीठोकपणे सांगतो. "मी प्रत्यक्ष म्हैस उडताना पाहिली आहे." असे ठामपणे विधान करायला तो कचरत नाही. त्यामुळे अफवा सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनतेला विश्वासात घेऊन तिचं आधीच निराकरण करणं श्रेयस्कर !

 एकटा माणूस हा वैयक्तिकरित्या चांगला किंवा वाईट असू शकतो. पण समूहात तो नेहमीच अधिक चांगला असतो. समूहमनाचं हे सामुदायिक शहाणपण; तसंच, श्रद्धा, चांगुलपणा जाणून आणीबाणीच्या प्रसंगी त्यांना चुचकारण्यासाठी, शांत करण्यासाठी त्या बाबींचा कौशल्यानं उपयोग केला पाहिजे.

 चंद्रकांतनं शिंगणापूरला आलेल्या यात्रेकरूंची श्रद्धा व यात्रा निर्विघ्न पार पडावी ही भावना ओळखून 'तुम्ही भाविक यात्रेकरू आहात, कुणी गुंड, लुटारू नाही. दर्शनासाठी पोलिस बंदोबस्त नसला तरी तुम्ही रांग लावून शांतपणे दर्शन चऊ शकता' असे म्हणत त्यांच्या नाडीवर नेमके बोट ठेवून त्यांना आश्वस्त कल. आणि त्यांच्यात मिसळत संवाद करीत त्यांना शांत केलं!

 समूहमनाचा स्वाभाविक चांगुलपणा, शांततावादी वृत्ती आणि समंजसपणा ही खरे तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी वरदान ठरणारी बाब आहे. तिचं महत्व व सामर्थ्य जाणण्यात अधिकारी कमी पडतात म्हणून तणाव-दंगली हातात, हे अधोरेखित करणारी ही घटना आहे.

 कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखायची असेल तर अधिकाऱ्यांनी

प्रशासननामा । १०१