पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर त्यांच्याशी हुज्जत घातली नसती आणि हा प्रसंग उद्भवला नसता!

 “दुसरी बाब, मॉब सायकॉलॉजीची कल्पना अभ्यासानं वा अनुभवाने येते. कलावंत प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना ती मूलत:च असते. चंद्रकांतनं गर्दीच मानसशास्त्र ओळखलं. 'मॉब कंट्रोल करण्यासाठी गोळीबाराची परवानगी मागणं म्हणजे गर्दीत घबराट माजवणं होय.' आणि असा प्रकार पोलिसांनी तर कधीच करू नये हे जाणून, सर्वांसमक्ष चंद्रकांतनं पोलिसांना शिव्या घातल्या आणि जनेतला आश्वस्त केलं की गोळीबार मुळीच होणार नाही. प्रशासकाला तडकाफडकी निर्णय घ्यावा लागतो.

 “या घटनेतला तिसरा पैलू म्हणजे जनतेला सामोरे जाणे. प्रक्षोभक प्रतिक्रियेचा संभव असूनही जनतेमध्ये जाणे, मिसळणे आणि त्यांच्या चांगुलपणाला आवाहन करणं हे फार महत्त्वाचं आहे.

 “आम्ही तेथे पोहोचेपर्यंत दोन तास प्रवेशद्वारी थांबून चंद्रकांतनं चक्क कीर्तनवजा भाषण करीत वेळ मारून नेली. या ठिकाणी त्याचं धर्मभान आणि मॉब सायकॉलॉजीची जाण यांचा उपयोग झाला.

 "ही प्रशासनासाठी एक नमुनेदार केसस्टडी ठरू शकते. या तीन सूत्राचा विचार करावा, असा प्रसंग आला तर शांत चित्तानं पण धैर्यपूर्वक सामार जावं."

 वाचकहो, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रसंगाच्या निमित्ताने जे विवेचन केले ते कायदा व सुव्यवस्था प्रशासनाचे सार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रसंग हा अधिकाऱ्यांच्या मॉब सायकॉलॉजीच्या परीक्षेचा क्षण असतो. त्यात अपयश आलं आणि परिणामी दंगल उसळली तर ती त्यांच्या कमतरतेची निदर्शक असते.

 गर्दीचं मानसशास्त्र जाणण्यासाठी मानवी मनाची आणि सामाजिक वर्तनाचा जाण असणं हे आवश्यक आहे.

 गर्दीच्या मानसशास्त्राचे एकाच वेळी दोन परस्पर विरोधी पैलू असतात.

 गर्दीतील माणसे एकाच वेळी हिंसक बनू शकतात किंवा भयभीत- पलायन करण्याच्या मन:स्थितीत असतात. यात्रेच्या प्रसंगात हे दोन्ही पैलू दिसून आले खानने कावडधाऱ्यांशी पोलिसी खाक्यानं हुज्जत घालताच भाविक यात्रेकरून संतप्त होत, हातातले नारळ फेकून लाठीधाऱ्या पोलिसांना जखमी करायचे हिंसक प्रयत्न केला. गोळीबारासारखी पोलीस कारवाईची भाषा ऐकताच ही जनता भयभीत होऊन पलायनाच्या मन:स्थितीत आली होती. अर्थात, तो भाग चंद्रकांतनं टाळला ही बाब निराळी! पण गोवारी हत्याकांड ही समुदायाच्या

१00 । प्रशासननामा