पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रुजू झाले (१९०८). आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत (१९६८) सलग ६० वर्षे त्यांनी केलेले कार्य म्हणजे 'मिशनरी झील' या शब्दाचे मूर्त रूपच

 गुलाबराव आवडे स्वतः महार कुटुंबात जन्मले. स्वातंत्र्यपूर्व काळात ख्रिश्चन मिशनच्यांच्या धर्मप्रचार, प्रसार व धर्मांतरामुळे त्यांचे कुटुंबीय ख्रिश्चन झाले असल्याने, त्यांचे शिक्षण ख्रिश्चन मिशन-यांच्या सान्निध्यात आले. त्यामुळे साहजिकच त्या धर्माबद्दल त्यांना सहानुभूती होती नि आहे. मधल्या काळात भारतातील मूळ हरिजन असलेले, धर्मांतराने ख्रिश्चन । झालेले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात येथील मागासवर्गीयांना घटनेने देऊ केलेल्या संधीचा फायदा करून घेणारे धर्मांतरित ख्रिश्चन आजही आहेत. आवडेंची हिंदू धर्माने हेटाळणी केली. ख्रिश्चन धर्माने त्यांना शिक्षणाने, संस्कारांनी मनुष्य बनवले. त्यांची नेत्रदीपक प्रगती झाली. मुलांना शिक्षण व नोकरी, कुटुंबाला घर, जागा, कर्ज इ. सुविधा दिल्या व कुटुंबाचे भौतिक जीवन समृद्ध झाले. जीवनाच्या संध्याकाळी सावली लांब होत चालली की, माणूस आपल्या जीवनाचा ताळेबंद तपासतो, तेव्हा त्याला महत्त्वाचे वाटतात ते माणूसपण देणारे घटक, व्यक्ती व संस्था! बौद्ध धर्मातील ‘अत्त दीप भव’ आणि ‘बायबल' मधील 'Know thyself' यांचा । संगम म्हणजे धर्मांतरितांचे जीवन!

  गुलाबराव आवडे यांनी या कृतज्ञतेपोटी रेव्ह. डॉ. हेन्री जॉर्ज हॉवर्ड यांचे लिहिलेले हे चरित्र म्हणजे एका परकीय माणसाने भारतात येऊन आपल्या समर्पित कार्याने भारताच्या डोळ्यांत घातलेले माणूसपणाचे अंजन होय. हे नुसते चरित्र नाही, तर भारतातील ख्रिश्चन मिशन-यांच्या कार्याचा व जीवनशैलीचा रेखाटलेला एक अभ्यासपूर्ण आलेख होय. हे चरित्र त्यांनी कृतज्ञतेपोटी लिहिले असले, तरी त्यात अतिशयोक्ती नाही की भाबडेपणाही । नाही. प्राप्त संदर्भाच्या आधारे रेखाटलेले हे साग्र चरित्र होय. ते त्यांनी सहा भागांत लिहिले आहे. संशोधकांची बैठक नसल्याने, चरित्रलेखनाच्या शास्त्रीय पठडीचा अभाव त्यात असला, तरी लेखकाची धडपड संशोधकापेक्षा कमी नाही, हे त्यांनी जमविलेले संदर्भ, व्यक्तींकडून आवर्जून करून घेतलेले लेखन, डॉ. हॉवर्ड यांच्या मुलाच्या लेखाचा करून घेतलेला अनुवाद, लिहिलेला इतिहास, जमविलेली छायाचित्रे, केलेली पायपीट व पदरमोड या सर्वांतून स्पष्ट होते. तसेच, रेव्ह. डॉ. हॉवर्ड यांच्याप्रती त्यांच्या मनातील आदरही स्पष्ट होतो. हे कार्य एकट्या गुलाबराव आवडे यांनी केले असले, तरी त्यात तत्कालीन उपकृत केलेल्या साच्या पिढीबद्दलची कृतज्ञता भरलेली आढळते. म्हणून हे चरित्र एका व्यक्तीचे असले, तरी

प्रशस्ती/७६