पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझी आई (कविता संग्रह) प्रहार प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशन - डिसेंबर, २००१ पृष्ठे ५४ किंमत ४०/-



कोंडलेले निःश्वास सोडताना  'माझी आई' हा सौ. प्रतिभा साठम यांचा दुसरा कविता संग्रह. यापूर्वी त्यांनी 'गुड्डू' नावाचा एक बालकविता संग्रह हातावेगळा केला आहे. त्यांच्या या कविता प्रौढपणातील. त्यामुळे जीवन अनुभवांचे कडू-गोड सारे त्यात सामावले आहे. भारतीय रमीच्या जीवनात कडू स्मृतींच्या मालिकेस अंतच असत नाही. तसे या संग्रहातील कवितांचेही आहे. आईचं न सांगता निरोप घेणं हा त्यातलाच एक भाग. जीवनातली सारी नक्षत्रं कोरडी गेल्याचा विवाह या कवितेत आहे. कवयित्रीने जीवनभर जे पाहिले, देखिले त्यांचे शब्द झाले, अर्थ साकळला, जीवन आकळले, या सर्वांची झाली कविता.
 सौ. प्रतिभा साठ यांच्या कविता शब्दप्रभू नसल्या, तरी अनुभव समृद्ध खचितच आहे. त्यात जीवनाचं कठोर सत्य सामावलेलं आहे. जीवन विसंगतीवर प्रहार करण्याचं त्यात सामर्थ्य आहे. 'मतदान' सारखी कविता वाचली की हे लक्षात येते. त्यांना निसर्गाची चांगली जाण आहे. निसर्ग कविता अनुप्रास आपसूकच फेर धरतो. 'मामा' सारखी कविता वाचकांना भावविभोर करते, काळजाचा ठाव घेते. 'वैर' सारखी कविता खेड्यातला भारत हुबेहूब चित्रित करते. त्या कवितेतील लोकजीवनाचं चित्र विलक्षण प्रभावी वाटतं. काही कविता बोधप्रद आहेत. 'जगायचे

प्रशस्ती / १९