पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/14

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाते त्याला दोहोंना अकारण मोठेपणा देत असते. अशा अकारण मिळणाच्या मोठेपणाच्या मोहापासून सुटका करायची म्हणून ती लिहिणे टाळत होतो. तरी या एकांकिकामागील सामाजिक तगमगीनेच खरे तर मला लिहायला लावले. या निमित्ताने मराठी एकांकिका नाटकाबद्दल वाचायची व विचार करायची संधी मिळाली त्याबद्दल एकांकिकाराचे आभार. प्रा. बाबासाहेब पोवार नाट्यलेखनास क्षणिक प्रक्षोभ न मानता सततच्या रियाजाने ते अधिक परिणामकारक करत राहतील अशी आशा करतो. त्यांच्या या प्रयत्नांस मनःपूर्वक शुभेच्छा!


दि. २४ फेब्रुवारी, २०१८

जागतिक मुद्रण दिन.

प्रशस्ती/१३