पान:प्रमाणशास्त्र.pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


९०
कर्णोपकर्णी पुरावा.

सबब होत्ये,असें इंग्लंडांत ठरविले आहे. साम्प्रत "आरोपित मनुष्याने, आपण अपराध केला आहे,असा जाब दिल्यास तो जाब सेशन कोर्टाने दफ्तरी "लिहावा,आणि त्याजवरून आरोपित मनुष्यावर "अपराध स्थापित करावा.”आणि कनिष्ठ कोडतांचा वहिवाटीस हाच नियम लागू केला आहे असे दिसते; परंतु अंगीकाराविषयी मजकूर हमेशा सावधगिरीने कबूल करण्याची वहिवाट आहे, आणि अपराधमूर्तीचा पुरावा शिवाय घेतात. हा बंदोबस्त इंग्लंडाचा पेक्षां या देशांत फारच आवश्यक आहे. याचप्रमाणे अंगीकाराचा मजकुरास दुसऱ्या स्वतंत्र पुराव्याचे प्रत्यंतर घेण्याची वहिवाट फौजदारी अदालतीत आणि जिल्ह्यांतील कोडतांत आहे. मुतु आणि पिरुमल यांचा कज्जांत मद्रास फौजदारी अदालतीने असा नियम निश्चित केला आहे की,“कैदीवर आरोपलेला गुन्हा खरोखर घडला "आहे, अशा शाबितीचा पुरावा असल्यावांचून त्याजवर अपराधस्थापन करण्यासाठी त्याणे सांगित"लेला अंगीकाराचा मजकूर मान्य करितां येत नाही."

 १८५. आपल्या मुलीने विष खाल्लं तेणेकरून ती वस्तुतः मरून गेली, हे माहीत नसतां तिजला, शासन करताना आपण तिचा प्राण घेतला, असे तिचा बापास वाटले; याप्रमाणे घडलेल्या गोष्टीविषयी चुकी होऊन एकादा मनुष्य अपराध पदरी घेण्याचा मजकूर सांगू शकेल, किंवा पीनल कोडाचा ३९० व्या कलमांत जबरीनें चोरी करण्याचा गुन्ह्यांत, जबरी