पान:प्रमाणशास्त्र.pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



अंगीकार

९१

आणि भीति ही अवश्य साधने म्हणून लिहिली आहेत ते माहीत नसतां, एकादा मनुष्य खरोखर चोरोचा गुन्ह्याचा मात्र अपराधी अप्सतां जबरीने चोरी केल्या बदलचा चार्जास आपण अपराधो आहों म्हणून जाब देईल; हा त्याणे कायद्याचा चुकीने जाब दिला असे समजले पाहिजे.

 १८६. साधारण कज्जांत आशा किंवा भीति येणेकरून एकादा निरपराधी मनुष्य अपराधाविषयी खोटसाळ अंगीकाराचा मजकूर सांगण्यास प्रवृत्त होतो, अशा साधारण प्रकारचा गोष्टी आहेत, त्या एथे न सांगतां, कितीएक ठिकाणी कमी उघड हेतूंवरून तसाच खोटा अंगीकार करण्यास मनुष्य उद्युक्त होतात, त्याविषयीं आतां आपण विचार करूं. कितीएक मनुष्य, जो एकादा फार मोठा अपराध त्यांणी खरोखर केला असतो त्याजविषयों चौकशी न व्हावी या आशेनें, एकाद्या लहान अपराधाचा अंगीकार करून खोटेच कबूल झाले आहेत. केवळ जीवाचा कंटाळ्यामुळे कितीएकांनी प्राणान्त दंडाचे अपराध अंगीकत आहेत, असें ऐकण्यांत आहे. आपल्या नवन्यापासून घटस्फोट करून घेण्याकरितां, किंवा आपल्या वाटेस कोणी जाऊ नये म्हणून, असा आ. पला खासगत मतलब पार पाडण्यास्तव स्त्रियांनी व्यभिचाराचा खोटाच अंगीकार केला, असें ऐक. ण्यांत आहे. आपल्या नावाचा लोकांत पुकार व्हावा अशा हौसेने किती एकांनी अंगीकाराचा खोटा मजकूर सांगितला आहे; आणि इंग्लंडांतील शिपाई