पान:प्रमाणशास्त्र.pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अंगीकार.

८९

हेतूस अनुसरून एका मिलाफदाराने लिहिलेलें पत्र, त्याचा संगतीचा मिलाफदाराने पाहिलेले नसतांही, त्याचा विरुद्ध पुरावा होते; परंतु झालेल्या व्यव. हाराविषयी एकाद्या मिलाफदाराने केवळ हकीकत सां. गितली असून, ती साधारण हेतुसिद्ध्यनुकूलतेचा इ. राधाने सांगितली नसेल, तर अशी केवळ हकीकत संगतीचा मिलाफदाराविरुद्ध अग्राह्य आहे.

 १८२. दिवाणी प्रकरणांतील कबूलपणा प्रमाणेच एकाद्या आरोपित मनुष्याने सांगितलेल्या अंगी. काराचा बाबदीत असा नियम आहे की, जा पक्षकाराने अंगीकाराचा मजकूर सांगितला असेल,तो सविस्तर पाहून त्यावरून कोडतास न्याय करितां यावा यास्तव तो सर्व वाचून ऐकण्याचा किंवा पुनः वदवून घेण्याचा त्या मनुष्यास हक्क आहे; परंतु, त्याचा प्रत्येक अंश एकसारखा विश्वसनीय आहे,असा याचा अर्थ होत नाही. अंगीकाराचा मजकुराचा एकाद्या अंशावर विश्वास ठेवण्यास आणि बाकीचावर बेभरवसा करण्यास चांगले कारण असूं शकेल, आणि त्याप्रमाणे करण्यास कोडतास मुखत्यारी आहे.

 १८३.आतां कैदीने सांगितलेल्या अंगीकासचा मजकरास किती वजन द्यावे याचा आपण विचार करूं.

 १८४. एकाद्या गुन्ह्याविषयी आपखुशीने सांगितलेल्या अंगीकाराचा मजकुरावरूनच प्राणान्त दंडाचा अपराधाविषयी अपराधस्थापन करण्यास पुरती