पान:प्रमाणशास्त्र.pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


८८
कर्णोपकर्णी पुरावा

येतो,आणि दुसऱ्या कैदीस त्याचा खरेपणाचा पडताळा घेण्यास प्रतिप्रश्न करण्याची सवड नसत्ये;असें असून मुळीच तो सांगणाराचा विरुद्ध पुराव्यांत घेतला जातो याची तरी सबब इतकीच आहे की,एकादा पक्षकार आपल्या हिताविरुद्ध अंगीकाराचा खोटा मजकूर सांगणार नाही. परंतु ही सबब दुसयावर दोषारोप करण्यास लागत नाही;आणि पुकळ कज्जातून अंगीकाराचा मजकूर सांगणाऱ्या मनुष्यास आपल्या अपराधांत दुसऱ्यास भागीदार करण्याविषयी,आणि ते आपल्यापेक्षा जास्त अपराधी आहेत असेंही दाखविण्याविषयी सबळ मोह असतो;परंतु गुन्ह्यास सहाय करणाराची निराळी चौकशी चालली असल्यास, मुख्य गुन्हेगाराला त्याचा विरुद्ध साक्षीदाराप्रमाणे साक्ष देता येईल असे दिसते;आणि कोणी जा एकाद्या कैदीशी मिळून एकादा अपराध केला असेल,त्या मिलाफदाराची चौकशी त्याचा बराबर होत नसल्यास या कैदीतरफे तो लायक साक्ष होतो.

 १८१. संगनमताबाबदचा कज्जांत खाली लि. हिल्या प्रमाणे नियम आहे. एकाद्या गैरकायदा कामाकरितां कित्येक मनुष्यांनी संगनमत केले आहे, असे शाबीत झाल्यास, त्यांपैकी एकाद्याने पूर्वसाङ्. केतिक बेतास अनुसरून आणि साधारण हेतूसंबंधी केलेलें दृढकथन, हे, सर्व मिलाफदारांचे दृढकथन किंवा कृत्य आहे, असे मानण्यांत येऊन ते सर्व जुटीचा विरुद्ध पुराव्यांत घेण्यांत येते. उदाहरण, साधारण