पान:प्रमाणशास्त्र.pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अंगीकार.

८७

नाकबूल केली. या कज्जांत त्या अंगीकाराचा मजकरापैकी कोणताही भाग मान्य झाला नाहीं; आणि पुढे कैदीने त्या अंमलदारास त्या माणसाचा घरी नेऊन त्या मनुष्यास दाखविलें, याविषयी सदरहु कैदीचा पूर्वोक्त कबूलपणा त्याच प्रमाणे अग्राह्य मानला गेला.

 १७९.एकाद्या अयोग्य रीतीने सांगितलेल्या अंगीकाराचा मजकुरापैकी,जितका खचीत झालेल्या घडलेल्या गोष्टीविषयी खास संबद्ध असतो, तितका मात्र ग्राह्य आहे असे दिसते;आणि याच कारणास्तव, आपण हजर केलेला माल चोरीचा आहे, असा कैदीने अयोग्य आबदाबाने सांगितलेला मजकूर मान्य करण्यांत येणार नाही. फिलिप्स् याणे असे लिहिले आहे की, अशी बोलणी गतव्यवहाराचा हकीकतीची नसतात, परंतु तो माल हजर करण्याचा कृत्याविषयी परिस्फोटकारक असतात, म्हणूनच मात्र ती मान्य करण्यांत येतात; असे मानतां येईल.

 १८०.संगनमता बाबदचे कज्जे खेरीज करून, एका कैदीने सांगितलेला अंगीकाराचा मजकूर दुसन्याविरुद्ध पुरावा होत नाहीं; आणि मुख्य गुन्हा करणाराने माजिस्वेटा पुढेही सांगितलेला अंगीकाराचा मजकर त्या गुन्ह्यास सहाय करणाऱ्याविरुद्ध पुरावा होणार नाही. या नियमाचा यथायोग्यतेविषयी लोक अंदेशा घेतात; परंतु ही गोष्ट आपणास ध्यानांत ठेविली पाहिजे की, अंगीकाराचा मजकूर न्यायसंबंधी शपथ घेतल्यावांचून हमेशा सांगण्यांत