पान:प्रमाणशास्त्र.pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



८६
कर्णोपकर्णी पुरावा.

माहिती आहे, असें शाबीत करण्यास्तव पुराव्यांत घेतला जाईल; परंतु त्या अंगीकाराचा मजकुराचा दुसरा भाग घेतला जाणार नाही.धमकीचा किंवा अभिवचनाचा आबदाबाने सांगितलेला अंगीकाराचा मजकूर खोटा असेल या कल्पनेने वर्ज करण्यांत येतो; परंतु त्यापैकी जितका एकाद्या खचीत झालेल्या घडलेल्या गोष्टीविषयी असतो तितका उघड खरा आहे, असे समजून मान्य केला जातो; आणि याच कारणावरून, "जा मनुष्यावर अपराध केल्याची "फिर्याद झाली, त्याणे आपल्यापाशी बातमी सांगि"तल्यावरून एकाद्या घडलेल्या गोष्टीचा थांग आपणास लागला, अशा अर्थाची जबानी कोणा पोलीस कामगाराने दिली असतां, ती बातमी सांगणे,"हे अपराध कबूल केल्या अगर पतकारल्या दा“खल असो अगर नसो, त्या बातमीचा जितक्या अंशाचा त्या बातमीवरून जा घडलेल्या गोष्टीचा " थांग लागला त्या गोष्टींशी स्पष्ट संबंध असेल, तितका अंश पुराव्यास घेण्याचा अखत्यार आहे.(सन १८६१ चा आक्ट २५ कलम १५० ).परंतु अशा अंगीकाराचा मजकुरापैकी एकादा भाग ग्राह्य होण्यास्तव त्याचा प्रत्यंतरास काही घडलेली गोष्ट असली पाहिजे,हे निखालस अवश्य आहे. उदाहरण, अभिवचनाचा आबदाबाने एका कैदीने अंगीकाराचा मजकूर सांगितल्यानंतर, एका मनुष्यापाशी चोरीचा माल दिला आहे, असे सांगून तो मनुष्य दाखवून दिला आणि त्या मनुष्याने ती गोष्ट