पान:प्रमाणशास्त्र.pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



८४
कर्णोपकर्णी पुरावा.

कबुलातीचा मजकूर जर तो आपोआप सांगू लागला,तर माजिस्टानें त्यांतील घडलेल्या हकीकतींविषयी त्याला तपशीलवार प्रश्न करावे, आणि प्रत्येक सवाल व जबाब पूर्णतेने लिहून घ्यावा. आरोपित मनुष्याला आपल्या उत्तरांचा अर्थ स्पष्ट करण्याची किंवा त्यांत जास्त मजकूर घालण्याची परवानगी आहे, आणि मग, ही जबानी बरोबर आहे, असे त्याणे म्हटल्यावर त्या जबानीखाली माजिस्नेटाने आपली सही करून, ही जबानी माझा समक्ष व मला ऐकू येई अशा रीतीने घेतली आहे, व जा मनुष्यावर फि. दि झाली त्याणे जो मजकूर सांगितला तो सर्व हीत बरोबर लिहिला आहे, असा आपल्या सहीनिशी. चा शेरा तिजवर लिहिला पाहिजे, (सन १८६१ चा आक्ट २५ कलमें २०२, २०३, २०५ आणि २४९).

 १७५.जबानीवरील माजिस्त्रेटाचा सहीनिशी चा शेऱ्याचा खरेपणाविषयीं सेशन कोर्टास संशय नसल्यास,त्याजपुढे झालेली आरोपित मनुष्याची पुरशीस सदरील माजि स्त्रेयाचा शेऱ्याचा खरेपणाचा पुरावा न मागतां पुराव्यांत घ्यावी, आणि माजिस्लेयची सदरील सही, ही सदरहू पुरशिशीविषयी प्रथमदर्शनी पुरावा होईल (सन १८६१ चा आक्ट २५ कलम ३६६ ); आणि हा आक्ट चालू होण्यापूर्वीही; एकाद्या पुरशिशीविषयी आणि अंगीकाराविषयीं तो पूर्वोक्त लेख उत्कृष्ट पुरावा आहे, असें हमेशा मानले आहे.

 १७६. (सबाडिनेट म्हणजे) ताब्यांतील जज