पान:प्रमाणशास्त्र.pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अंगीकार.

८३

अंगीकार;तसेंच,बंदिशाळेचा अंमलदाराने कैदीचे पत्र डांकेत पोचवण्याचे खोटें वचन दिले आणि पत्रमध्येच फोडिलें त्यांत गुन्ह्याचा अंगीकाराविषयी मजकूर लिहिला होता, तो अंगीकार; या उदाहरणांमधील अंगीकार त्या त्या कज्जांत कबूल करण्यांत आला आहे.त्या प्रमाणेच एका कन्नांत कैदी याणे गुन्ह्याचा अंगीकार केल्याचा मजकूर सांगावा म्हणून, त्याजला झिंगवला होता; या कज्जांत जा वेळी त्याणे अंगीकाराविषयी मजकूर सांगितला त्या वेळी जरी तो झिंगलेला होता तरी त्या गोष्टीवरून तो अंगीकाराचा मजकूर अग्राह्य होत नाही; परंतु त्यास जे वजन द्या. वयाचे त्यांत मात्र कमतरपणा येईल, असे ठरविले गेलें आहे.

 १७४. एकादा कैदी पोलिसाचा ताब्यांत नसतां, आणि कांहीं धमकी किंवा अभिवचनाचा उपयोग न करितां,जर त्यास अंमलदारानेही सवाल केल्यावरून त्याणे गुन्हा अंगीकारिला, तर तो अंगीकाराचा मजकूर पुराव्यांत कबूल करण्यांत येईल असे दिसते. चौकशी चालत असतां माजिस्लेटाने कोणतेही प्रश्न जे त्यास अवश्य दिसतील ते कैदी यास विचारावे; परंतु आरोपित मनुष्यास आपल्या मर्जीप्रमाणे त्यांची उत्तरे देण्याचा अथवा न देण्याचा अधिकार आहे. अभिवचने किंवा धमकी किंवा इतर आबदाबाने आरोपित मनुष्यास गुन्हा कबूल होण्यास उद्युक्त करूं नये; परंतु जा गुन्ह्याचा त्याजवर आरोप ठेविला असेल त्याविषयी