पान:प्रमाणशास्त्र.pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



८२
कर्णोपकर्णी पुरावा.

धमकीचा परिणाम अंगीकाराचा मजकूर सांगण्यापूर्वी नाहीसा झाला, असे ठरविले आहे, आणि त्या कारणास्तव तो अंगीकार पुराव्यांत घेतला गेला आहे.उदाहरण, जेव्हां अभिवचनानंतर किंवा धमकीनंतर माजिस्लेटाने किंवा इतर अंमलदार मनुष्याने कैदी याजला ताकीद दिली असेल की,जे कांहीं तूं सांगशील त्याचा उपयोग चोकशीसमयीं तुझा विरुद्ध केला जाईल,तेव्हां नंतर केलेला अंगीकार पुराव्यांत कबूल करण्यांत येतो.जसे,जर तूं गुन्हा कबल करशील तर मी शिपायास बोलावू पाठविणार नाही,असे कैदीचा धनिनीने अभिवचन देऊन कैदीस उद्यक्त केलें आणि शिपाई येऊन कैदी याजला घेऊन गेला,तेव्हां त्या अभिवचनाची सबब नाहींशी झाली,असा ठराव होऊन नंतर त्या शिपायापाशी केलेला अंगीकाराचा मजकूर पुराव्यांत घेण्यांत आला.

 १७३.अभिवचनाचा किंवा धमकीचा उपयोग न करितां युक्तीने किंवा फसवणीने करविलेला अंगीकार कबूल केला जातो."याच प्रमाणे खाली लिहिलेल्या प्रत्येक कजांत केलेले अंगीकार,म्हणजे कबूलपणे,पुराव्यांत घेतले गेले आहेत;जसे, कितीएक कज्जांत मिलाफी पूर्वीच पकडले गेले आहेत,अशा फसवणीनें कैदीस उद्युक्त करून करविलेला अंगीकार; तसेंच, कैदीने अपराध केला अशी उगाच थाप मारून तूं आपल्या चुलत्यास कसे विष घातले, असे एका पोलीसाचा शिपायाने विचारिलें होते, तेव्हां तिणे कबूल होऊन केलेला