पान:प्रमाणशास्त्र.pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अंगीकार.

८१

धमकी कैदी यास देऊन अंगीकार करविला असल्यास तो निरुपयोगी होणार नाही.

 १७०. कोणत्याही कैदीस धरल्यावर जर एकाद्या अंमलदाराने, तुला अमूक आरोपावरून धरला आहे,असे सांगितले, आणि अभिवचनाने किंवा धमकीने त्या आरोपाचा त्याजकडून गैरशिस्त रीतीने अंगीकार करविला,आणि जर नंतर जा एकाद्या दुसऱ्या गुन्ह्याविषयी त्याचा वहीम आला नव्हता न्याजविषयीं तो कबूल होईल तर त्याणे केलेला तो दुसऱ्या गुन्ह्याचा अंगीकार जेव्हां त्या दुसऱ्या गुन्ह्याविषयी चौकशी चालू होईल तेव्हां त्याचा गुन्ह्याचा पुराव्यांत घेतला जाईल,असे इंग्लंडांत ठरविले आहे.परंतु कैदी याजला, अमुक आरोप तुजवर आहे, अशी खबर दिली नसल्यास तसे होणार नाही. )

 १७१अनधिकृत मनुष्याने अधिकान्याचा "समक्ष कैदीस उद्युक्त करून अंगीकार करविलाअसेल, आणि तो अधिकारी कैदीस सावध करणार "नाही आणि आपली असंमतिही दर्शविणार नाही, "तर तो कैदीने केलेला अंगीकार पुराव्यांत ग्राह्य नाही." परंतु जा एकाद्या मनुष्याचा अधिकार किंवा सत्ता कैदीवर नसेल, किंवा धमकी अमलांत आणण्याची किंवा अभिवचन पूर्ण करण्याची शक्ति नसेल, तर अशा मनुष्याने दुसऱ्या कोणत्याही प्रकारे धमकी किंवा अभिवचन देऊन करविलेला अंगीकार अग्राह्म होणार नाही.

 १७२. कित्येक कजांत अभिवचनाचा किंवा