पान:प्रमाणशास्त्र.pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



८०
कर्णोपकर्णी पुरावा.

दासीने केलेल्या गुन्ह्याचा अंगीकार मान्य करण्यांत आला नाही.

 १६८.याचप्रमाणे अंगीकाराचा मजकूर सांगण्याकरितां अभिवचनाने किंवा धमकीने किंवा दुसऱ्या कोणत्याही रीतीने एकाद्यास उद्युक्त करण्याची पोलीस अंमलदारांस आणि इतरांस मनाई आहे.परंतुउलट पाहतां,एकादा कैद केलेला मनुष्य आपखुशीनें एकादी उघडीक करण्यास इच्छीत असेल तर व्याजला ताकिदीने किंवा इतर तन्हेने ती करण्यास त्यांणी मनाई करूं नये. आणि एकाद्या पोलीस अंमलदारापाशी सांगितलेला अंगीकाराचा मजकूर जा मनुष्याने सांगितला असेल त्याचा विरुद्ध पुराव्यांत ग्राह्य नाही, आणि त्याचप्रमाणे पोलिसाचा कैदेत असतां आरोपित मनुष्याने सांगितलेला एकादा अंगीकाराचा मजकूर, प्रत्यक्ष माजि स्त्रेटासमक्ष सांगितलेला नसल्यास, तो मजकूर त्या आरोपित मनुष्याचाविरु• द्ध पुराव्यांत घेतला जाणार नाहीं ( स० १८६१ चा आक्ट २५ कलमें ९८, १४६, १४८ व १४९). "

 १६९. अंगीकार करून मजकूर सांगितल्यास तुजला बरें पडेल, किंवा अंगीकार करून मजकूर सागितला नाही तर तुझें वाईट होईल, म्हणून एकाद्या अंमलदारानें कैदीला सांगितले असून त्यावरून केलेला अंगीकार त्या कैदीविरुद्ध ग्राह्य होणार नाही. परंतु परलोकी ईश्वराचा क्षमेविषयी किंवा तेथे मिळणा-या सुखदुःखांविषयी सांगून अभिवचन किंवा