पान:प्रमाणशास्त्र.pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अंगीकार,

७९

विषयी कर्णोपकर्णी पुरावा घेतला जातो. कारण,एकादा मनुष्य आपल्या हिताविरुद्ध आपखुशीनें खोटा मजकूर सांगेल,असा संभव नसतो.अंगीकाराविषयी कर्णोपकर्णी पुरावा जा शर्तीने कबूल करण्यांत येतो, त्याविषयी आपण प्रथमतः व्याख्या करून अशा पुराव्यास साधारणतः किती वजन योग्य आहे, याचा नंतर विचार करूं.

 १६७. एकादा अंगीकाराचा मजकूर आपखशीनें आणि स्वसंतोषाने झाला असेल तरच त्याचा उपयोग आहे, असा त्यांचा आधाराधेय संबंध आहे; म्हणून, जेव्हां एकाद्या अंमलदार माणसाकडून मिळालेल्या एकाद्या अभिवचनामुळे, किंवा धमकीमुळे तो अंगीकार झाला आहे, अशी कल्पना करण्यास कांही कारण असल्यास, तो अंगीकाराचा मजकूर पुराव्यांत मान्य होण्यापूर्वी, अभिवचन किंवा धमकी नव्हती, असा पुरावा झाला पाहिजे. अशा बाबींतसरकारी अंमलदार व वैद्य व जेलर ( म्हणजे काराग्रहाध्यक्ष) आणि शिपायी यांस मात्र अंमलदार मनुष्य मानले जाते असें नाहीं; परंतु, यजमान आणि यजमानीन हीही मानली जातात. परंतु यजमानीन असल्यास, ती घरचा कारभार पाहत असली पाहिजे. उदाहरण, एका दासीवर खुनाचा आरोप आला होता तिला तिची यजमानीन म्हणाली, "जर तूं अप- "राधी असशील तर कबूल हो, तेणे करून कदाचित् "तुझा जीव बचावेल." या अशा सांगण्यावरून न्या