पान:प्रमाणशास्त्र.pdf/251

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२४२
खासगी लेख.

" करून दिल्याची शाबिती झाली, म्हणजे ती पावती " सदरहु प्रकारचा कोर्टासमक्ष, किंवा मनुष्यासमक्ष, " ती करून देणारावर पुराव्यास कबूल करणे योग्य " आहे इतकेच नाही, परंतु ती पावती जा मनुष्याविषयी सोडचिठीप्रमाणे असेल त्या मनुष्यावर, अथवा पैका, किंवा ऐवज, किंवा माल पोंचल्याचे "पावतींत कबूल केले असेल त्याविषयी, ती लिहून " देणारा जा मनुष्यास जबाबदार होत असेल त्यावरही, पुराव्यास कबूल करण्या योग्य आहे असे " समजावे.” (कलम ४२ ). " मालकाने दिलेली "पावती जा प्रसंगी मागील कलमान्वये पुराव्यास "कबूल करण्यास योग्य असेल, त्याप्रसंगी मालकाचा गुमास्त्याने, किंवा चाकराने दिलेली पावती, " त्याचप्रमाणे पुराव्यास कबूल करणे योग्य आहे " असे समजावें; परंतु ती देण्याचा अधिकार गुमास्त्यास किंवा चाकरास होता असे शाबीत झालें पाहिजे.