पान:प्रमाणशास्त्र.pdf/250

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

अनुसरून करावा, हे शिस्तवार नाही असे कोणी म्हणणार नाही.

 ४४७. एकाद्या लेखी दस्तऐवजांतील शब्द, त्यांतील पूर्वापरसंबंधावरून गौण अर्थाने योजिले आहे. त असे दिसत नसल्यास, ते प्रधानार्थी समजले पाहिजेत. कज्जाचा हकीकतोस अनुसरून त्या शब्दांचा प्रधानार्थी वाक्यार्थ होत असेल तोपर्यंत, ते शब्द गौणार्थी समजले जावे अशा इराद्याने लिहिले आहेत, असें शाबीत करण्याकरितां बाह्य पुरावा ग्राह्य होणार नाही.

 ४४८. कोणत्याही दस्तऐवजांतील शब्दांचा प्रधानार्थ धरिला असतां, कज्जाचा हकीकतीसंबंधी कांहीं अर्थ होत नसल्यास, तो दस्तऐवज लिहिणाराने कांही गौणार्थाने ते शब्द लिहिले आहेत असे दाखविण्याकरितां मुद्याबाहेरील गोष्टीचा पुरावा ग्राह्य होतो.

 ४४९. एकाद्या कलेसंबंधी किंवा शास्त्रासंबंधी जो शब्दांचा विशेष अर्थ असतो तोच त्याचा प्रधानार्थ होय, असे साधारणतः मानले जाईल; परंतु ते शब्द या जगांतील साधारण व्यवहाराविषयी असल्यास, साधारण लोकोपचारांत जो अर्थ होत असेल, तोच त्यांचा प्रधानार्थ असे समजले पाहिजे.

 ४५०. हे खासगत लेखांविषयींचे व्याख्याप्रकरण झाले; त्यांत सन १८५५ चा दुसऱ्या आक्टान्वयें लेखी पावतीपासून परिणाम काय आहे, हे सांगणे राहिले आहे. तो असा; (कलम ४१) “पैका, " किंवा ऐवज, किंवा माल पोचल्याबदल पावती