पान:प्रमाणशास्त्र.pdf/249

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२४०
खासगी लेख.

मृत्युपत्रावरून अबचा वडील मुलगा क याजला दिली असेल, आणि अबचा वडील मुलाचे नाव ग आणि दुसऱ्या मुलाचे नाव क असेल, तर अशा कजांत, ते वर्णन एका मनुष्यास किंवा वस्तूस काही अंशी लागू पडते व दुसऱ्यास काही अशी लागू पडते, असे बाह्म पुराव्यावरून दिसून येत असल्यास, अशा कजांत त्या मृत्युपत्रांत कोणत्यास मिळकत देण्याचा इरादा होता, हे दाखविण्याकरितां बाह्य हकीकती. विषयी पुरावा घेण्यांत येईल; तथापि, तो दस्तऐवज देणाऱ्याचा इराद्याविषयींचा साङ्केतिक मजकूर वर्ज केला जाईल., एकादें साद्यंत वर्णन, किंवा वर्णनाचा भाग, एकाद्या माहित मनुष्यास किंवा वस्तूस लागू पडतोसें दिसत नसेल, तर अशाचा खुलासा करण्यास्तव इराद्याविषयी साङ्केतिक मजकूर ग्राह्म होणार नाही.

 ४४६. एकाद्या लेखी दस्तऐवजांतील शब्दाचा योग्य अर्थ उघड करण्यास्तव तो सर्व वाचला पाहिजे आणि त्याचा एक भाग दुसऱ्या भागाशी मिळवून त्या दस्तऐवजाचा निरनिराळ्या भागांमध्ये तेच शब्द कोणकोणत्या अर्थाने लिहिले आहेत हे पाहिले पाहिजे, असा चालू नियम आहे; त्या प्रमाणे एकाद्या खताचा मजकुराचा किंवा कायदे करते मंडळीचा आक्टांतील मजकुराचा बहुधा प्रारंभी जो उद्देश लिहिलेला असतो, त्यावरून एकंदराचा अर्थाचा खुलासा होतो; आणि एका भागाचा अर्थ दुसऱ्या भागास