पान:प्रमाणशास्त्र.pdf/248

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

२३९

वस्तु एकाच नावाचा असतात, तेव्हां. उदाहरण, जर एकाद्या मृत्युपत्रांत व्यंकटस्वामी नैदु, याचा नावे मिळकत दिली असेल, तर हा शब्द जात्या मुग्धार्थ नाही, परंतु त्या नावाचे पुष्कळ मनुष्य आहेत असे शाबीत केल्यावर, तो तसा होतो. या स्वरूपाचा मुग्धार्थतेस 'गुप्त मुग्धार्थता' असे म्हणतात; व जी मुग्धार्थता दस्तऐवजाचा स्वरूपावरून उघड दिसते, आणि जीस स्पष्ट मुग्धार्थता म्हणतात, तीपासून ही मुग्धार्थता भिन्न होय. उदाहरण, एकाद्या मरणाराने आपल्या मृत्युपत्रांत आपली अ नावाची मिळकत अमुक मनुष्यास दिली असे लिहिले, तर याचा अर्थ त्या अ नावाचा दोन मिळकती होत्या असे शाबीत होई तोपर्यंत, स्पष्टच आहे. परंतु अ नावाचा दोन मिळकती आहेत असे शाबीत झाल्यास, त्यापासून त्या दस्तऐवजास गुप्त मुग्धार्थता उत्पन्न होत्ये, आणि अशी मुग्धार्थता त्या स्वतां दस्तऐवजांतील काही अस्पष्टतेपासून उत्पन्न होत नसून बाह्य गोष्टीवरून उत्पन्न होते; म्हणून तिचा खुलासा बाह्य पराव्या वरून आणि साधारणतः मरणाराने आपल्या इराद्याविषयी सांगितलेल्या मजकूराचा पुराव्यानेही करता येतो.

 ४४५.परंतु त्या दस्तऐवजांत लिहिलेले वर्णन कायद्यावरून खचितपणे एकापेक्षा अधिक मनुष्यांस किंवा वस्तूंस एकसारखें लागू होत असल्यास मात्र तो दस्तऐवज लिहून देणाराचा इराद्याविषयींचा मजकर पुराव्यांत ग्राह्य होतो. जसे, एकादी मिळकत