पान:प्रमाणशास्त्र.pdf/247

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२३८
खासगी लेख.

नाहीं; तिजवरून त्या लेखाचा खरा अर्थ काय होतो याचा खुलासा करण्याची, आणि तो त्यांतील योग्य विषयास लागू करण्याची मात्र परवानगी मिळेल.

 ४४२. पुष्कळ ठिकाणी एकाद्या मृत्युपत्राचा किंवा इतर दस्तऐवजाचा अर्थ, ज्या हकीकतींचा अनुरोधाने ते दस्तऐवज लिहून दिलेले असतात, त्या हकीकती माहीत झाल्यावांचून, बराबर समजला जात नाही, हे उघड आहे. यास्तव अशा कजांत त्या कुटुंबाची स्थिति, हकीकती व खासगी दौलत, व दुसऱ्या गोष्टी, जेणेकरून तो दस्तऐवज योग्य वस्तूस व योग्य मनुष्यांस लागू करून त्यांतील हेतु स्पष्ट करण्यास तो पुरांव्याचा रूपाने उपयोगी पडेल, तेथे पूर्वोक्त गोष्टींविषयी बाहेरील पुरावा घ्यावा.

 ४४३. एकाद्या पुरातन दस्तऐवजाचा इरादा, तो लिहून दिल्यानंतर त्या अन्वये लवकरच झालेल्या कृत्यांवरून काढिता येतो. म्हणून एकाद्या धर्मादायाचा पैका, तो धर्मादाय चालू होण्याचा अवेलीस.कसा खर्च करीत असत, यावरून, ज्या दस्तऐवजा वरून तो धर्मादाय स्थापित झाला असेल, त्याचा अर्थ समजण्यास उपयोग होतो.

 ४४४. जी मुग्धार्थता दस्तऐवजाचा स्वरूपावरून दृष्टीस येत नसते, परंतु त्यांतील विषय ओळखण्याची तजवीज पाहतां उत्पन्न होते, अशीविषयी मात्र, ज्या मनुष्याने तो दस्तऐवज लिहून दिला त्याचा इराद्याचा पुराव्या करितां त्याची बोलणी कबूल करज्यांत येतात. जसे, दोन किंवा अधिक मनुष्य किंवा