पान:प्रमाणशास्त्र.pdf/246

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

२३७

चालू प्रकाराविषयी बाहेरील पुरावा घेण्यांत येतो; आणि असा पुरावा घेणे त्यास, “करारास वहिवाटींतील नित्य गोष्टी जोडणे " असे म्हणतात. म्हणून एकादी हुंडी किंवा 'प्रामिसरी नोट, यांचा ऐवज एकाद्याने अमुक दिवशी देणे कबूल केले असल्यास, त्या ठिकाणचा मामुल चालीवरून त्यांत लिहिलेल्या तारिखेवर अमुक साहोलतीचे दिवस देण्यांत येतात, असें बाह्य साक्षीवरून शाबीत करितां येते; आणि त्याच प्रमाणे नोकर लोकांनी, "अमुक मुदत पर्यंत मी चाकरी करीन व मी कधी ही वेळ फुकट जाऊं देणार नाहीं," असा लेखी करार लिहून दिला होता, त्या कजांत अशा चाकरीचे करार लिहून देणाऱ्या नोकरांस अमुक सणांची व रविवारची सुटी मिळत असते, अशी त्या चाकर लोकांचा धंद्याची चाल किंवा रीतिशाबीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 ४४०. लौकिकी चालीचा साक्षीवरून ज्या पक्षकारास बाध येतो, त्याजला, अशी चाल मुळीच नाही. किंवा ती गैरकायदा किंवा गैरवाजवी आहे. किंवा त्या करारांत ती येऊ नये असा इरादा होता. असे शाबीत करण्याचा अधिकार अर्थात् आहे.

 ४४१. दुसरी अशी गोष्ट आहे, की जा एकाद्या मद्याचा गोष्टीवरून दस्तऐवजांत लिहिलेली मनुष्य किंवा वस्तु ओळखण्याचा उपयोग घडतो त्या गोष्टीविषयी बाह्म पुरावा घेण्यांत येतो; परंतु. अशा पुराव्यावरून तो लेखी दस्तऐवज फिरविण्याची किंवा त्या विरुद्ध शाबिती करण्याची परवानगी मिळणार