पान:प्रमाणशास्त्र.pdf/245

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२३६
खासगी लेख.

"पातळी' या शब्दाचा उपयोग केला होता, त्याचा अर्थ खाण खणणारे लोक काही विशेष समजत असत; आणि एका कुरणांतील ससे देण्याचा पठ्यांत " एक हजार ससे" याचा अर्थ, त्या प्रान्तांतील चाली प्रमाणे एक हजार दोनशें ससे समजला जात होता, असें शाबीत करण्याकरितां बाह्म पुरावा घेतला गेला आहे.

 ४३८. परंतु जें स्पष्ट असेल त्या विरुद्ध शाबिती करण्यास, किंवा ते बदलण्यास, लौकिकी चालीविषयी पुरावा घेण्यांत येणार नाही. आणि एकाद्या दस्तऐवजांत लिहिलेल्या शब्दाचा अर्थ कायद्यांत अमुक होत असल्यास, त्या अर्थी त्या शब्दाचा उपयोग केला नाही, असे दाखविण्याकरितां तोंडचा पुरावा अग्राह्य होय आणि खुद दस्तऐवजांतील शब्दांवरून उघड रीतीने लोकज्ञात अर्थ गाळला असल्यास, पूर्वोक्त पुरावा अग्राह्य होईल.

 ४३९. परंतु त्या दस्तऐवजांतील शब्दांनी लौकिकी अर्थ वर्ज केलेला नसल्यास, तो दस्तऐवज लिहून देणाऱ्या पक्षकारास, त्याविषयी मामुल चाल किवा रीति काय आहे, ते माहित होते, आणि त्याणे तो दस्तऐवज अशा मामुल चाली अन्वयेंच लिहून दिला, असे साधारणतः अनुमान होते; यास्तव ज्या एकाद्या बाबतीत एकादी ठरलेली मामुल चाल असेल, अशा प्रकारचा कज्जांत, जसे, जमीनीचा मालक व भाडोत्री यांचा दरम्यानचे करार, व व्यापार संबंधी करार, व या प्रकारचे दुसरे करार, यांत त्या त्या बाबतीमधील