पान:प्रमाणशास्त्र.pdf/244

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

२३५

म्हणजे त्या खुद लेखाशिवाय इतर पुराव्याने, शाबीत करितां येतात.

 ४३६. यद्यपि एकाद्या लेखी दस्तऐवजांतील करार रद्द करण्यास किंवा बदलण्यास बाह्य पुरावा घेऊ नये असे आहे, तथापि संशयाचा सर्व बाबतीत, म्हणजे ज्या ठिकाणी त्या दस्तऐवजाचा भाषेतील शब्द संदिग्ध किंवा व्यर्थ असतील तेथें, त्या शब्दांचा अर्थ समजविण्यास, आणि त्या दस्तऐवजांत लिहिलेले मनष्य किंवा वस्तु ओळखण्याकरितां बाह्य पुरावा घ्यावा.

 ४३७. त्याच प्रमाणे एकादा दस्तऐवज संक्षिप्त शब्दांनी किंवा अस्पष्ट अक्षरांनी परभाषेत लिहिलेला असल्यास, त्याचा अर्थ समजविण्याकरितां कुशल साक्षीदाराची साक्ष घेण्यांत येते. आणि त्याच प्रमाणे एकाद्या दस्तऐवजांत लिहिलेल्या शब्दाचा अर्थ एकाद्या कलाकौशल्याचा संबंधाने, किंवा शास्त्रसंबंधाने, किंवा व्यापाराचा संबंधाने भिन्न होत असल्यास किंवा एकाद्या ठिकाणी, किंवा एकाद्या जातीचा मनुष्यांत त्या शब्दांचा विशेष अर्थ ज्ञात असल्यास, तो शब्द कोणत्या अर्थी लौकिकांत समजतात याविषयी मजकूर सांगण्यास साक्षीदार याजला अखत्यार आहे. आणि असा पुरावा देत्ये वेळी जा मनुष्याने तो दस्तऐवज लिहून दिला त्याचा बहुतकरून कोणत्या अर्थी तो शब्द योजण्याचा इरादा होता, हेही आनुमानिक पुराव्यावरून शाबीत केलें पाहिजे; म्हणून कोळशांचा खाणीविषयी एका पट्यांत