पान:प्रमाणशास्त्र.pdf/243

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२३४
खासगी लेख.

४३३. या ग्रंथाचे कलम ४२७ यांतील साधारण नियमास एक असा अपवाद आहे, की एकाद्या लेखी पावतीतील ऐवज न दिल्याचा पुराव्याने, किंवा तो पावती कपटाने किंवा चुकीने, किंवा एकाएकी गांठून करून घेतली आहे, अशा पुराव्याने ती पावती रद्द करण्यास तोंडचा पुरावा ग्राह्य आहे.

 ४३४. आणखी असे सांगणे आहे, की एकादा लेखी दस्तऐवज, कपटाने, किंवा गैरकायदा, किंवा जुलुमाने, किंवा धमकीने करून घेतला आहे, असे शाबीत करण्याकरितां बाह्म पुरावा हमेशा ग्राह्य आहे. परंतु एकाद्या पक्षकारास आपल्या स्वतांचे कपट स्थापित करून एकादा दस्तऐवज रद्द करितां येणार नाही.

 ४३५. याच प्रमाणे, एकादी विवक्षित देवघटित गोष्ट घडल्यावर मात्र एकादा दस्तऐवज अमलांत यावा, अशा हेतूने तो एकाद्या तिऱ्हाईत मनुष्यापाशी ठेवावयास दिलेला असल्यास, त्यास' इसको 'म्हणजे खरडा असे म्हणतात; अशा सारिखा दस्तऐवज अमलांत येण्याचा इराद्याने मुळीच दिलेला नव्हता, किंवा तो बनाऊ आहे,किंवा अज्ञानदशेमुळे किंवा अन्य कारणाने तो लिहून देणारा कायद्याप्रमाणे लायक नव्हता, किंवा कायद्यावरून ज्या एकाद्याबाबतीची मनाई आहे, त्या बाबतीविषयीं तो लिहून दिलेला आहे, इत्यादिक गोष्टींची शाबिती बाह्म पुराव्यावरून करतां येते. या सर्व हकीकती आणि त्याच प्रमाणे दस्तऐवजाचा ऐवज पोचला नाही ही गोष्ट, या सर्व बाह्य साक्षीने,