पान:प्रमाणशास्त्र.pdf/242

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

२३३

" परिशिष्टांत त्या इमारती वगैरे तपशीलवार लिहिल्या असून त्यांचा नकाशा काढिला होता " त्यांत त्यांचे वर्णन लिहिले होते. या कज्जांत त्या "परिशिष्टांत व नकाशांत में एक आवाड आलेलें " नव्हते, ते हमेशा 'गाटन फार्म जमीनीचा भाग " आहे असे समजून वापरित असत, असे शाबीत "करण्याकरितां आणिलेला बाहेरचा पुरावा घेतला "नाही. एका रोख्यांतील करारावरून तो सामईक " असेल, तर तो रोखा लिहून देणारांपैकी एक असामी जामीन मात्र होता, आणि चिठीतील दुसरा " मनुष्य मालक असून त्यास धनकोने मुदत दिली " आहे, अशाविषयीं तोडचा पुरावा घेतला जाणार "नाही.

 ४३१. हा वरील नियम त्या दस्तऐवजाचा पक्षकारांचा दरम्यानचा बाबतीत, किंवा त्यांचा हक्काने दावा सांगणारांचा बाबतीत मात्र लागू पडतो; आणि ज्या एकाद्या दस्तऐवजांत तिऱ्हाईत पक्षकारांचा संबंध नसतो, त्या तिऱ्हाईतांस, त्यांत लिहिलेल्या मजकुरा विरुद्ध बाहेरील पुराव्यावरून वाद सांगण्यास मोकळीक आहे.

 ४३२. एकाद्या लेखी दस्तऐवजांत केवळ लौकिक रीतीप्रमाणे लिहिलेली एकादी बाबत असेल, तर तद्विरुद्ध स्थापन करण्यास्तव, व, त्या खतात जी मिती लिहिलेली असेल त्या मितीस ते खत लिहून दिलें नाही, अशीही शाबिती करण्यास तोडचा पुरावा ग्राह्य आहे, असे दिसते.