पान:प्रमाणशास्त्र.pdf/241

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२३२
खासगी लेख.

ला आफू काण्ट्याक्टस् " म्हणजे कराराविषयीचा कायदा या ग्रंथांतून घेतलेली आहेत.

 "अनें बला, तीन महिन्यांचाआंत दर क्वार्दास "अमुक प्रमाणे शंभर क्वार्ट गहूं देण्याविषयी लेखी " करार करून दिला असल्यास, खरेदी देणाराचे गलबत ओडिसा बंदरांतून गहूं भरून आल्यास मात्र "गहूं देईन असें तो लेखी ठराव होते वेळी ठरले " होते, असे शाबीत करण्याकरितां तोंडचा पुरावा "घेतला जाणार नाही. कारण, तेणे करून स्वतंत्र " लेखी करार तोंडचा पुराव्याने फिरवून साङ्केतिक "करार केला असे होईल. त्याचप्रमाणे एकाद्या 66 चिठीचा ऐवज एकाद्या दिवशी देण्याचा कबूल केलेला असला, तर, तिच्या ऐवजी दुसऱ्या एकाद्या ६ दिवशी द्यावयाचा इरादा होता, असे दाखविण्याकरितां तोंडचा पुरावा घेतला जाणार नाही." याचविषयीं टेलर याणे खाली लिहिलेली उदाहरणे सांगितली आहेत. "सुरीनम् बंदरापासून लंडन बंदरापर्यंत जाणारे गलबत किंवा गलबतें, यांवरील " मालावर विमेपत्र स्वीकारले होते; त्या कज्जांत त्या " गलबतांपैकी जे एक गलबत नाहीसे झाले होते हैं तो करार करत्ये वेळी त्या करारांतून मुखजबानी "गाळलेले होते, असे शाबीत करण्याकरितां तोंडचा परावा अग्राह्य होय, असे ठरविले. त्याचप्रमाणे, "एका खतावरून, गाटन् फार्म, या नावाची जमीन आणि तिजवरील इमारती फरोक्त झाल्या, असे "खरेदी खत झालेले होते, आणि त्या खतास जोडलेल्या