पान:प्रमाणशास्त्र.pdf/238

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

२२९

तेवढ्यांवरच भरवसा ठेवणे हे निर्भय नाही. आणि सन १८६० चा ४१२ नंबरचे स्पेशल अपील, तारीख २५ एप्रिल सन १८६१ रोजी फैसल झाले, त्यांतील दस्तऐवज कर्ज घेतल्या बदल मजकूर कबूल केल्याविषयीं होता त्यांतही तसाच ठराव झाला.

 ४२५. जुन्या दस्तऐवजाचा अक्षराची शाबिती करणे, ती सदरहु कलमा अन्वयें, जुन्या दस्तऐवजाचा अक्षराची तुलना दुसरा खरा म्हणून कबूल केलेल्या दस्तऐवजाचा अक्षराशी करून, किंवा कामा अंती त्या अक्षराची ओळख जास झाली असेल, त्या साक्षीदाराचा साक्षीवरून करावी. म्हणून, फिट्जूवाल्टर पीरेज, या कज्जांत एका कुटुंबांतील मैयत मनुष्याने लिहून ठेविलेल्या जुन्या वंशावळीचा अक्षराविषयी मजकूर बोलण्यास त्या कुटुंबाचा वकिलास परवानगी दिली होती; कारण, त्या साक्षीदाराने म्हणजे वकिलाने आपल्या कामा अंती त्या मनुष्याने लिहिलेली पुष्कळ खते व इतर दस्तऐवज वाचले होते तेणेकरून त्या अक्षराची त्याजला ओळख झाली होती. परंतु त्या अक्षराची ओळख त्या साक्षीदाराला कामकाजाअंती झालेली पाहिजे, जे दस्तऐवज कोडतांत हजर केले नसतील त्यांवरील सह्या पाहून कज्जाचा चौकशीकरितां अभ्यास केलेला नसावा.

 ४२६. एकाद्या पुरातन दस्तऐवजाची बहुतकरून कोणती तारीख असावी, ते ठरविण्याकरितां प्राचीन काळचा कृत्यांचा शोध करणाराची साक्ष