पान:प्रमाणशास्त्र.pdf/237

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२२८
खासगी लेख.

एका अक्षराची दुसऱ्या अक्षरांशी प्रत्यक्ष तुलना कर रून त्याची शाबिती करण्याची परवानगी इंग्लिश कायद्यावरून नव्हती; परंतु सन १८५५ चा २ ऱ्या आक्याचा ४८ कलमा अन्वये, “सही, किंवा अक्षर, "किंवा शिक्का खरा किंवा खोटा आहे याविषयी चौकशी करणे असेल तेव्हां जाचा सहोविषयी, किंवा "अक्षराविषयी, किंवा शिक्कयाविषयी तक्रार असेल, "त्याची बिनतक्रारीची सही, किंवा अक्षर, किंवा "शिक्का ज्या दस्तऐवजावर असेल तो दस्तऐवज, त्या "मुकदम्यांतील पुराव्याचा कागद नसेल तथापि, त्या "वरील सही, किंवा अक्षर, किंवा शिक्का, तक्राररी "सहीशी, किंवा अक्षराशी, किंवा शिक्याशी, मिळवून पहावा.” आणि जज्जाने, किंवा जुरीनें, किवा ते अक्षर जा साक्षीदारांचा ओळखीचे असेल त्यांणी किंवा वाचण्याचा कामांत कुशल असणान्या साक्षीदारांनी वर सांगितलेली अक्षरतुलना करावी, असे दिसते.

 सन १८०६ साली कलकत्त्याचा निजामत अदालतीने केलेल्या ठरावावरून असे दिसते; की अक्षर मिळवून पाहणे हे मुसलमानी शास्त्रावरून प्रत्यंतरी पुरावा होय; परंतु अन्य पुरावा नसल्यास ते निश्यायक पुरावा होत नाही. तसेच स. १८५८ चा स्पेशल अपील नंबर १४० यांत दस्तऐवजाचो शाबिती इतर रीतीने करितां आली असतो, असें मद्रास एथील सदर अदालतीस दिमून आले, त्यावरून असे ठरविण्यांत आले, की अशा पुराव्यास प्रत्यंतर नसतां केवळ