पान:प्रमाणशास्त्र.pdf/239

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२३०
खासगी लेख.

पुराव्यांत ग्राह्य आहे. आणि एकाद्या दस्तऐवजांतील अक्षर कपटाने लिहिलेले आहे, किंवा खरे लिहिलेलें आहे, हे पाहण्याकरितां, कृत्रिम दस्तऐवज ओळखण्याकरितां जो मनुष्य नेमला असेल, त्याची साक्ष पुराव्यांत ग्राह्य आहे, असे दिसते.

 ४२७. ब्रिटिश् रयतेने केलेले मृत्युपत्र किंवा यासारिख्या दुसऱ्या बाबती, जेथे लेखी दस्तऐवज मात्र एकाद्या विवक्षित घडलेल्या गोष्टीविषयी पुरावा होईल असे कायद्याने ठरविले असेल, त्या गोष्टीची शाबिती तोंडचा पुराव्याने करितां येणार नाही. आणखी त्याच प्रमाणे करार करणाऱ्या पक्षकारांनी आपल्या कराराचा शर्ती लेखी दस्तऐवजाने करण्याचे कबूल केले असल्यास, बाह्य पुरावा, म्हणजे त्या दस्तऐवजाखेरीज इतर पुरावा घेण्यांत येऊन, ज्या वेळी तो करार झाला त्या वेळी किंवा त्या पूर्वी एकादा मजकूर होऊन त्यावरून त्या लेखी दस्तऐवजांत जे ठराव लिहिले आहेत त्यांपासून करार करणाऱ्या पक्षकारांचा इरादा भिन्न होता, असे शाबीत करितां येणार नाही; म्हणजे तो दस्तऐवज सही करून देत्ये वेळी, किंवा त्या वेळा पूर्वी, जो मजकूर तोंडी किंवा लेखी झाला असेल, त्याविषयी बाह्य साक्ष देऊन लेखी दस्तऐवजांतील ठराव रद्द करितां येत नाही, किंवा फिरवितां येत नाही, किंवा त्यास अधिक मजकूर लावितां येत नाही, किंवा त्यांतून कांही उणे करितां येत नाही कारण जे ठराव पक्षकारांनी लेखाने कबूल केले आहेत, ते, त्या पक्षकारांचा इराद्याविषयी