पान:प्रमाणशास्त्र.pdf/236

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

२२७

त्याचा हातचे पाहिले असतील, तर त्या साक्षीदाराकडून त्या अक्षराची शाबिती करितां येते. एकाद्या मनुष्याला पत्र पाठविले असून त्याचा जबाब आला, तर तो जबाब त्याणे लिहिला आहे, असे अनुमान करणे सयुक्तिक होय. आणि त्या उत्तरास अनुसरून पुढे आणखी काही व्यवहार किंवा पत्रव्यवहार' झाला असेल, तर त्या अनुमानास बळकटी येते , परंतु त्या पत्रव्यवहारावरून त्या साक्षीदाराने एकादे कृत्य केले असावे, असे आवश्यक नाहीं; कारण, मुखत्यार, किंवा कारकून, किंवा नोकर लोक, जाणी आपल्या धंद्याचा क्रमांत विवक्षित अक्षर वारंवार पाहिले असेल, ते त्याविषयी साक्ष देण्यास लायक आहेत; कारण ते अक्षर त्यांणी पाहिले असेल त्यावरून त्यांस आपलें काम चालवितां येते की नाही याविषयी ते कल्पना करूं शकतील.

 ४२२. ज्या मनुष्याचे अक्षर साक्षीदाराला पूर्वोक्त रीतीने माहीत झाले, त्याच मनुष्याचा अक्षराचा हल्ली वाद पडला आहे असे त्याच साक्षीदाराकडून किंवा इतर रीतीने हमेशा शाबीत झाले पाहिजे.

 ४२३. ज्या अक्षराविषयी वाद पडलेला असेल, ते अक्षर त्या मनुष्याचा अक्षरासारिखें आहे, असे साक्षीदाराने सांगितल्यास बस नाही, असे दिसते. ते अक्षर त्याचेच आहे किंवा नाही, याविषयी जो ग्रह झाला असेल तो, किंवा निदान त्याणे आपला अभिप्राय तरी सांगितला पाहिजे.

 ४२४. पूर्वी काही विशेष गोष्टी खेरीज करून