पान:प्रमाणशास्त्र.pdf/235

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२२६
खासगी लेख.

तो सही करून दिला असेल त्याची, किंवा जा एकाद्या साक्षीदाराची त्यावर साक्ष नसून त्या दस्तऐवजावर सही झाली त्या वेळी जो हजर असेल व ज्याने सही करितां पाहिली असेल त्याची साक्ष घेणे, ही काम चालविण्याची रीति फार उघड आहे.

 ४१९. किंवा ज्या मनुष्याने एकादा दस्तऐवज लिहिला असेल, किंवा सही करून दिला असेल, त्याचा अक्षराची शाबिती ज्या एकाद्या साक्षीदाराने त्याजला लिहितांना पाहिले असेल त्याचा साक्षीने करितां येते, आणि त्या साक्षीदाराने त्याजला लिहितांना पाहिले त्या वेळानंतर पुष्कळ वर्षे लोटली असली तरी, आणि त्या साक्षीदाराने त्याजला त्याचा आडनावाखेरीज दुसरें कांही लिहितां पाहिले नसेल तरी. ही, त्याची साक्ष उभय पक्षीही एकसारिखी ग्राह्य होते; परंतु अर्थातच, त्या साक्षींची मातब्बरी एकसारिखी असणार नाही.

 ४२०, फिर्याद दाखल होऊन कज्जास सुरुवात झाल्यानंतर, त्या पक्षकाराला लिहितां पाहिले असल्यास ते बस नाहीं; कारण की त्या साक्षीदाराला धुकविण्याकरितां बुद्धिपूर्वक अक्षराचे वळण फिरविःलें असेंही होईल.

 ४२१. पुनश्य, जर एकाद्या साक्षीदाराने एकाद्या पक्षकारास कधीही लिहितांना पाहिले नसेल, आणि साधारण कामकाजा अंती शाबीत झालेले किंवा त्या मनुष्याने लिहिलेले आहेत, असें ज्याविषयी स्पष्टपणे अनुमान करितां येत असेल असे दस्तऐवज,