पान:प्रमाणशास्त्र.pdf/234

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख

२२५

केलेल्या ऐवजाविषयी लेखी सोडचिठीने मात्र भरणा केल्याची शाबिती होऊ शकेल, असे ठरविण्याचा कोडताचा इरादा होता असे उघड दिसते."

 त्याच प्रमाणे सन १८५९ चे स्पेशल अपील नंबर २०२, फैसल तारीख २५ एप्रिल सन १८६०, यांतील पक्षकार मुसलमान असून काजी अलकुझात याणे आपला अभिप्राय दिला, की “एकादा दस्तऐवज भरपाई करून सोडून दिल्याविषयी तोंडची साक्ष "मुसलमानी शास्त्रावरून कबूल करितां येत नाही. तो दस्तऐवज रद्द करण्याकरितां सोडचिठी "प्रमाणे पावती वगैरे जी असणे ती लेखी असली पाहिजे." सदर अदालतीने या अभिप्रायास अनुसरून सिव्हिल जज्जाचा निवाडा फिरविला, आणि खर्चासुद्धा वादीचा वतीने ठराव केला.

 ४१७. एकाद्या हप्नेबंदीचा खतांत “जे हप्ने देण्यांत येतील ते या खतावर लिहावे, आणि याविषयीं "वाद पडल्यास कोणत्या दुसऱ्या रीतीने समजूत केल्याचे बोलणे अर्थात् मान्य करूं नये," असा ठराव होता. त्यांत प्रतिवादीने लेखी फारकत दाखल केली होती, ती खतावर लिहिलेली नव्हती; सबब सदर अदालतीने ती नाकबूल केली. (सन १८५५ चें स्पेशल अपील नंबर २ यांतील तारीख ७ माहे मार्च सन १८५५ चा निवाडा पहा.)

 ४१८. एकादा लेखी दस्तऐवज सहीनिशी पुरा झाल्याबदल त्यावरील साक्ष घालणान्या साक्षीदारांचा पुराव्याने शाबीत होत नसल्यास, ज्या मनुष्याने