पान:प्रमाणशास्त्र.pdf/233

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२२४
खासगी लेख.

 ४१६. लेखी आणि तोंडचा करारांचा दरम्यान हिदुशास्त्रांत मोठा भेद मानिलेला आहे असे दिसते; कारण एका हवालेचिठीवरून व्याजमुद्दल सुद्धा ऐवज घेण्याविषयी केलेल्या फिर्यादीत, प्रतिवादीने ती चिठी कबूल करून त्या रकमेपैकी काही अंश फेड केल्याची तक्रार सांगितली, त्यांत कांही अंश फेडल्याबदल पुराव्याकरितां प्रतिवादीने लिहिलेला हिशेब सिव्हिल जजानें कबूल केला; या सबबेवरून सदर अदालतीने स्पेशल अपील मंजूर केले, आणि त्यांत शेवटला ठराव खाली लिहिल्याप्रमाणे झाला.

 "सदर कोर्टाचा पंडितांचे अनुमत घेतल्या वरून "त्यांणी असा अभिप्राय दिला, की खत रद्द केल्यावांचून, किंवा लेखी सोडचिठी हजर केल्या वांचन, "कर्जाविषयी लेखी पुरावा रद्द होत नाही. त्या खतांतून मोकळीक झाल्याबदल पुरावा हजर करण्यास "प्रतिवादीपाशी नसल्यामुळे ते खत त्याजवर काईम "आहे असे सदर अदालतीचा नजरेस येते. सन १८५५ चा स्पेशल अपील नंबर १२७ फैसल तारीख ३० जानेवारी १८५६, आणि सन १८५६ चे स्पेशल अपील नंबर ३७ फैसल तारीख २० आगस्ट सन १८५६, यांत तोच नियम लागू केला आहे. वरील ठरावांत 'रद्द होणे' हा शब्द लिहिण्यांत आला हैं नीट झाले नाही. कारण, निदान त्या कज्जांत तरी प्रतिवादी याणे, ते खत रद्द करण्याकरितां अर्ज केला नव्हता, परंतु काही ऐवज भरल्याचा शाबितीविषयी होता, आणि खतांतील रकमे पैकी परत भरणा