पान:प्रमाणशास्त्र.pdf/232

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख

२२३

खरेपणा ज्या पक्षकाराने ते लिहून दिले तो कबूल करीत असला तथापि त्या दस्तऐवजाची शाबिती त्यावर साक्ष घालणाऱ्या साक्षीदारांकडून झाली पाहिजे, असें इंग्लंडांतील कामन् लावरून अवश्य आहे असे दिसते. परंतु १८५७ चा आक्ट २ कलम ३८, या अन्वयें "साक्ष घातलेला दस्तऐवज मी करून दिला " आहे, असें तो दस्तऐवज करून देणारांपैकी कोणी "पक्षकार कबूल करील तर ज्या दस्तऐवजाचा खरेपणा" विषयी साक्ष घालणे कायद्याप्रमाणे अवश्य असेल " तशा प्रकारचा तो दस्तऐवज असला तथापि, त्या " पक्षकाराचे कबूल करणे, दस्तऐवज करून देण्याविषयी त्याचा विरुद्ध प्रथमदर्शनी पुरता पुरावा " आहे असे समजावे." (या ग्रंथाचे कलम १५५ व १५६ पहा.)

 ४१५. एका शिक्यानिशी खत, किंवा इतर दस्तऐवज, त्याच योग्यतेचा अन्य दस्तऐवजानें, म्हणजे शिक्यानिशी दस्तऐवजाने मात्र सोडून दिला, किंवा फिरविला, किंवा रद्द केला जातो; आणि तसे करण्यास एकादा बिनशिक्याचा दस्तऐवज बस नाही. परंतु एकाद्या शिक्यानिशी दस्तऐवजांतील ठराव पुरे केले, या विषयी हलक्या जातीचा पुराव्याने म्हणजे बिनशिक्याचा दस्तऐवजाने शाबिती करितां येते म्हणून एकाद्या शिक्यानिशी खतांत लिहिलेली रकम दिल्याची शाबिती तोंडचा पुराव्याने करितां येते, कारण त्या फेडीनें तो दस्तऐवज रद्द होत नाही, परंतु पुरा होतो.