पान:प्रमाणशास्त्र.pdf/231

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२२२
खासगी लेख.

चांगल्या पुरत्या सबबेने लिहून दिले आहे, असें ईग्लंडांतील कायद्यावरून निश्यायक अनुमान होते. आणि जरी त्या दस्तऐवजास कपट व तटावरून दोष लावितां येईल, तथापि बिनशिक्याचा कराराचा कज्जांत ज्या प्रमाणे पावतीची तक्रार चालते तशी शिक्यानिशींचा दस्तऐवजास चालू शकत नाहीं; आणखी इंग्लिश् कायद्यावरून खतावर साक्षी घालणारांपैकी निदान एका साक्षीदाराने, किंवा त्याचा सह्मांविषयीचा पुराव्याने खताची शाबिती झाली पाहिजे. तें खत पुरे होत्या समयी जे इतर लोक हजर असतील, त्यांची साक्ष त्या खताची शाबिती करण्यास्तव पुराव्यांत अग्राह्य आहे. परंतु सन १८५५ चा दुसऱ्या आक्टाचा ३७ व्या कलमांत असें ठराविले आहे, की पार्लमेण्याचा आक्टावरून ब्रिटिश् रयतेने केलेल्या मृत्युपत्रावर व यासारिख्या इतर दस्तऐवजावर साक्षी असल्या पाहिजेत, अशा ज्या दस्तऐवजाचा खरेपणाविषयी त्याजवर साक्ष असणे आवश्यक होय, असे दस्तऐवज शिवाय करून, साक्ष घातलेल्या दस्तऐवजाची शाबिती बिनसाक्षीचा दस्तऐवजा प्रमाणे करितां येईल.

 ४१३. परंतु एकतरफी मुकदम्यांत चाले पावेतो विशेषेकरून साक्षीदार हमेशा हजर केले पाहिजेत. ज्या साक्षीला हजर करितां आले असते, अशा साक्षीस हजर न केल्याने संशय उत्पन्न होतो.

 ४१४. जा एकाद्या खतावर किंवा दस्तऐवजावर कायद्यावरून साक्षी असल्या पाहिजेत, त्याचा