पान:प्रमाणशास्त्र.pdf/230

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

२२१

मजकुराची बाबत ही अपवाद आहे असे म्हटले पाहिजे. दफ्तरांतील मजकूर सहीनिशी खऱ्या केलेल्या किंवा प्रतिज्ञेवर केलेल्या नकलांनी शाबीत होतो, परंतु त्याची शाबिती तोंडचा पुराव्याने होत नाही; आणि एकादा दाखला किंवा नकल अशा सारिखा गौण पुरावा विवक्षित नमून्याचा असावा असे एकाद्या आक्टावरून किंवा कायद्यावरून ठराविलेले असल्यास, कोणताही अन्य नमून्याचा पुरावा घेतला जाणार नाही.

 ४१०. एकादी नकल सहीनिशी खरी झालेली नसल्यास, किंवा नकल करण्याचा यंत्राने केलेली नसल्यास, तिचा अचूकपणा हमेशा शपथेवरून किंवा प्रतिज्ञेवरून शाबीत केला पाहिजे. नकलेची नकल कधीही कबूल केली जाणार नाही.

 ४११. इंग्लिश कायद्यांत शिक्क्यानिशी लेखी दस्तऐवज, व बिनशिक्याचे दस्तऐवज, असे दोन वर्ग केले आहेत. शिक्कयानिशी दस्तऐवजांचा वर्गात संग्रहित जे कर्जरोखे ते बिनशिक्याचा दस्तऐवजापेक्षा फार विचाराने व गंभीरपणाने केलेले असतात. असें अनुमान करून ते दस्तऐवज अधिक उच्च वर्गातील आहेत, असे मानिले आहे. हा भेद, जेव्हां फार पुरातन काळी लोकांस सह्या करितां येत नव्हत्या तेव्हां ते आपल्या शिक्याचा उपयोग करीत असत, या गोष्टीवरून उत्पन्न झाला असावा असें मानलें आहे.

 ४१२. एकादें शिक्यानिशी खत असल्यास, तें