पान:प्रमाणशास्त्र.pdf/229

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२२०
खासगी लेख.

त्याजपाशी असतील ते हजर करण्याविषयी, साक्षीदारावर सक्ती नाही, इतकेंच एथें सांगणे राहिले आहे. (या ग्रंथाचे कलम ३०३ पहा ).

 ४०७. पुनः, हिशेब किंवा कागद अतीच मोठे असल्यामुळे तपासून पाहण्याची सवड नसल्यास, ज्या साक्षीदाराने ते तपासले असतील त्याजला ते हिशेब प्रत्यक्ष हजर केल्यावांचून मुख्य बाकीविषयी मजकूर सांगण्याचा अखत्यार आहे; परंतु त्याजला त्या हिशेबांतील विवक्षित बाबतींविषयी मजकूर सांगतां येणार नाही. आणखी, सन १८५९ चा आक्ट ८ कलम १८१ अन्वये हिशेब तपासण्यास किंवा सुधारण्यास नेमलेल्या कमिशनराने केलेल्या चौकशीचे कागद, "कोर्यस नापसंत होण्याचे कारण नसेल तर" त्याच कलमावरून पुरावा मानले आहेत.

 ४०८. जेथे एकाद्या दस्तऐवजांतील मजकुराविषयीं गौण पुरावा ग्राह्य आहे, तेथें तो तोंडचा किवा लेखी असला तरी चालेल. त्याचा स्वरूपावरून त्याचा ग्राहतेस बाध येणार नाही. कारण गौण पुराव्याचा अनेक पायऱ्या असून एक जाति हजर करितां येत असल्यास अन्य जाति वर्ज करावी असा कायदा नाही; परंतु हा नियम गौण पुराव्याचा ग्राह्यतेस मात्र लागू पडतो, त्याचा विश्वसनीयतेस लागू पडत नाही. कारण, एक जाति दुसऱ्या जातीपेक्षा अधिक विश्वसनीय असेल असें बहुधा होईल.

 ४०९. कायद्याचा दृष्टीने गौण पुराव्याचा पायऱ्या नाहीत, या नियमास, सरकारी दफ्तराचा