पान:प्रमाणशास्त्र.pdf/228

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख

२१९

साक्षीदारास दस्तऐवज हजर करण्याविषयी समान झाले असून, एकाद्या पक्षकाराने तो दस्तऐवज न्याचा कबजांतून कपटाने व तर्कटाने किंवा जबरीने घेतला असल्यास, तो हजर करण्याविषयी पूर्वी नोटीस दिल्यावांचून त्याचा मजकुराविषयी गौण पुरावा देण्याचा अखत्यार आहे.

 ४०५, शेवटींचे सांगणे की, प्रतिपक्षकारापार्शी असल दस्तऐवज कोर्टात आहे, अशी शाबिती झाल्यास, तो हजर करण्याविषयी त्याला पूर्वी नोटीस करण्याची जरूर नाही.

 ४०६. पांचवा प्रकार एकाद्या तिऱ्हाईत मनुष्याचा हातांत दस्तऐवज असून कायद्याप्रमाणे तो हजर करण्याविषयी त्याजवर सक्ती करितां येत नसल्यास, व तो दस्तऐवज हजर करण्याचे नाकबूल करीत असल्यास, अशा ठिकाणी गौण पुरावा ग्राह्य आहे. जो साक्षीदार दस्तऐवज हजर करण्याचे नाकबूल करितो, त्यास तसे करण्यास कायद्याचा आधार पाहिजे, नाहीं तर गौण पुरावा ग्राह्य होणार नाही. परंतु पाहिजे तर त्या पक्षकाराने त्या साक्षीदारावर दावा करावा. (या ग्रंथाचे कलम २८९ यांत) हक्काचा मजकुराचा सबबेने ते हजर करण्यास नाकबूल जाण्याची मोकळीक साक्षीदारास कोणत्या मजकराविषयी आहे ते आपण लिहिलेच आहे, आणि स्थावर मिळकतीविषयी आपल्या हक्काची खतें, किंवा दुसऱ्या मनुष्याकरितां गाहाणाचा संबंधाने किंवा विश्वासाने राखण्याचा संबंधाने जे दस्तऐवज