पान:प्रमाणशास्त्र.pdf/227

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२१८
खासगी लेख.

व तो आपणास हजर करावाच लागेल, असे प्रतिवादीस खचित समजण्यासारिखें असेल, तर असला दस्तऐवज हजर करण्याविषयी नोटिशीची जरूर नाही. अशा कज्जांत तो दस्तऐवज हजर करण्याविषयी पूर्वी नोटीस दिल्यावांचून, त्या दस्तऐवजांतील मजकुराविषयी गौण पुरावा देण्याचा अखत्यार आहे; कारण जी एकादी वस्तु अडकवून ठेविली असेल, किंवा हरविली असेल, तर तिचे जसें वर्णन दिले जाते, त्याप्रमाणे त्या दस्तऐवजाचे निरूपण करण्याचा अखत्यार आहे. आणि त्याच प्रमाणे एकादा लेखी दस्तऐवज चोरिल्याचा आरोपांत त्या दस्तऐवजाचा मजकूर एकदम गौण पुराव्याने शाबीत करितां येतो, आणि सदरील सर्व कजांत प्रतिवादी याणे आपल्या तकरारीचें साधन म्हणून तो असल दस्तऐवज हजर केला असेल, तरीही त्याचा गौण पुरावा घेण्यांत येईल. अशा कज्जांत त्या दस्तऐवजाचा मजकूर पर्यायाने मात्र येतो, परंतु कोणताही दस्तऐवज बनाविल्याचा आरोपांत त्या बनावलेल्या दस्तऐवजांतील मजकुराविषयी प्रत्यक्ष वाद असून बारकाईने वर्णित करण्याची आवश्यकता असत्ये, आणि त्या आरोपाचा स्वरूपावरून, तो दस्तऐवज आपणास हजर करावा लागेल, असे प्रतिवादी याजला समजू शकत नाही, यास्तव तो त्याचा कबजांत असल्यास त्या दस्तऐवजांतील मजकुराविषयीं गौण पुरावा कबूल करण्यापूर्वी तो हजर करण्याविषयी त्याजला नोटीस दिली पाहिजे.

 ४०४. आणखी असे सांगणे आहे, की एकाद्या