पान:प्रमाणशास्त्र.pdf/226

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

२१७

आहे. त्या दस्तऐवजाची तारीख किंवा मजकूर सविस्तर लिहिण्याची जरूर नाही.

 ४००. ज्या एकाद्या पक्षकारास एकादा दस्तऐवज हजर करण्याविषयी नोटीस लागू झाली असून तो पक्षकार तो दस्तऐवज न आणील, आणि त्याचा प्रतिपक्षी त्या दस्तऐवजांतील मजकुराचा गौण पुरावा देईल, तर त्या गौण पुराव्याचा निवारणार्थ पुढे त्याला तो दस्तऐवज हजर करितां येत नाही.

 ४०१. ज्या पक्षकाराने हजर करण्याविषयी नोटीस दिली असेल, त्याणे चौकशीसमयीं तो हजर करण्याविषयी सांगण्याची जरूर नाही; परंतु, जर तो पक्षकार तो दस्तऐवज हजर करवून पाहील, तर तो दस्तऐवज पक्षकारांचा दरम्यान पुराव्याप्रमाणे कज्जांत दाखल केला पाहिजे.

 ४०२. एकादी नोटीस हजर करण्याविषयी दुसरी नोटीस देणे जरूर नाही. आणि दस्तऐवज हजर करण्याविषयींचा नोटिशीखेरीज अनेक तऱ्हाचा दुसऱ्या नोटिशीस हा नियम लागू होतो असे दिसते.

 ४०३. पुनः असे सांगणे आहे, की दस्तऐवज अडकवून ठेविला, किंवा त्याचे रूपांतर केलें, किंवा तो गढळपणानें हरविला, अशां सारख्या कारणावरून आणलेल्या फिर्यादीत, कज्जांतील (प्लीडिंगांवरूनच म्हणजे ) कागदांचा मजकुराचा स्वरूपावरूनच, तो दस्तऐवज आपल्याजवळ आहे असा आरोप येईल,